जळगावात प्रसुत झालेल्या सूनेच्या उपचाराच्या पैशावर चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 19:31 IST2017-11-15T17:18:32+5:302017-11-15T19:31:17+5:30
प्रसुत झालेल्या सुनेचे दवाखान्याचे बील भरण्यासाठी ठेवलेले २० हजार व अकरा ग्रॅमचे मंगळसूत्र चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना पिंप्राळा भागातील त्रिमुर्ती नगरात बुधवारी सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे घरमालक रवींद्र सुकलाल बारी हे कुटुंबियांसह घरात झोपलेले असतांना ही चोरी झालेली आहे.

जळगावात प्रसुत झालेल्या सूनेच्या उपचाराच्या पैशावर चोरट्यांचा डल्ला
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, १५ : प्रसुत झालेल्या सुनेचे दवाखान्याचे बील भरण्यासाठी ठेवलेले २० हजार व अकरा ग्रॅमचे मंगळसूत्र चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना पिंप्राळा भागातील त्रिमुर्ती नगरात बुधवारी सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे घरमालक रवींद्र सुकलाल बारी हे कुटुंबियांसह घरात झोपलेले असतांना ही चोरी झालेली आहे.
पिंप्राळा परिसरातील त्रिमुर्ती नगरात रवींद्र सुकलाल बारी हे कुटूंबियांसोबत वास्तव्यास आले. त्यांचा टेन्ट हाऊस फुलांचा व्यावसाय आहे.मोठा मुलगा दिनेश हा विवाहित असून सुन ममता यांची खासगी दवान्यात प्रसुती झाली असल्याने त्या दवाखान्यात आहेत.दवाखान्याचे बील भरण्यासाठी त्यांनी २० हजार रुपये जमविले होते तर ११ ग्रॅम सोने हे पुर्वीचेच होते. याच मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
विळ्याने कापले कपाट
मंगळवारी पत्नी दवाखान्यात असल्याने दिनेश रात्रभर घरी नव्हते, तर रवींद्र बारी, त्यांच्या पत्नी लिलाबाई व लहान मुले घरात झोपलेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. यानंतर घरात संपूर्ण खोलींची पाहणी करुन आतील खोलीतील कपाट पलंगाच्या अंथरूणाखाली ठेवलेल्या विळ्याच्या सहायाने कापून कपाट फोडले व त्यातील २० हजार रूपयांची रक्कम तसेच खुंटीला टांगेलेल्या पॅँटच्या खिशात ठेवलेले ११ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र घेऊन चोरट्यांनी पोबरा केला. पहाटे साडे चार वाजता बारी हे लघु शंकेसाठी उठले असता त्यांना घराची मागील दरवाजा उघडा व कपाट फुटलेले दिसले.