शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे फौजदाराच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 1:02 AM

चोरट्यांचे पोलिसांना आव्हान : मेडीकल दुकानही फोडले

अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यातील मंगरूळ येथे पोलीस उपनिरीक्षकाच्या घरासह मेडिकल दुकान फोडून सुमारे ३७ हजारांचा माल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना १ सप्टेंबर रोजी पहाटे घडली.मंगरूळ येथे हर्षल धर्मराज सैंदाणे यांचे मेडिकल दुकानाच्या शटरचे कुलूप कटरने कापून दुकानातील ३७ हजार रुपये रोख आणि चांदीची लक्ष्मीची मूर्ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली. तर समोरच असलेल्या पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या घराचे कुलूपही चोरट्याने कटरने कापून दुसऱ्या मजल्यावरील कपाटातील वस्तू चोरून नेल्या आहेत . मात्र घरातील व्यक्ती गावाला गेलेल्या असल्याने तेथे काय चोरले गेले हे समजू शकले नाही.पोलीस कॉन्स्टेबल किशोर पाटील , विजय साळुंखे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी हर्षल सैंदाणे यांच्या फिर्यादीवरून भादंवि ४५७ , ३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एएसआय सुभाष साळुंखे करीत आहेत.जळगावात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्याजळगाव शहरात आदर्श नगरातील मकरा पार्कमध्ये दोन ठिकाणी तर समता नगरात एक अशा तीन ठिकाणी एकाच रात्री घरफोड्या झाल्याच्या घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्या. समता नगरात विमलबाई सोनार (वय ७०) यांच्या बंद घरात खिडकीची जाळी काढून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व ३५ हजार रुपये रोख असा अडीच लाखाच्यावर मुद्देमाल लांबविला.समता नगरात विमलबाई सोनार या एकट्या राहतात. मध्यरात्री चोरट्यांनी खिडकीची जाळी उचकवून घरात प्रवेश केला. सुटकेसमध्ये ठेवलेले ७ तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, ७ ग्रॅमची अंगठी व ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी व ३५ हजार रुपये रोख काढून घेत चोरट्यांनी ही सुटकेस बाहेरच्या खोलीत फेकून दिली होती. विमलबाई सकाळी उठल्या असता त्यांना सुटकेस बाहेर व उघडी दिसली. घरातील अन्य वस्तूही त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विमलबाई यांचे नातेवाईक संजय सोनार यांनी रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली.आदर्श नगरातील मकरा पार्कमध्ये अनिल रत्नाकर शिंदे व कैलास रामदास पाटील यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र या दोन्ही घरांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. अनिल शिंदे हे पुणे येथे तर कैलास पाटील हे अष्टविनायक दर्शनाला गेलेले आहेत.दोन्ही कुटुंब परिवारासह बाहेरगावी असल्याने घरांना कुलूप होते. सकाळी संजय चव्हाण यांना शिंदे यांच्या घराचा दरवाजा उघडा व कुलुप तुटलेले दिसल्याने त्यांनी शिंदे यांच्याशी संपर्क साधला. घरात रोकड किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmalnerअमळनेर