शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

चोरटय़ांनी काठी मारल्याने रेल्वेखाली पाय कापले

By admin | Updated: February 22, 2017 00:35 IST

कानपूरचा तरुण गंभीर : मोबाईल लांबविण्यासाठी जीवघेणा प्रयत्न

जळगाव :  पुष्पक एक्सप्रेसच्या दरवाजात बसून मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणाला चोरटय़ांनी मोबाईल लांबविण्यासाठी काठी मारुन फेकली. या घटनेत तरुण थेट रेल्वेखाली आल्याने त्याचे दोन्ही पाय कापले गेल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास भुसावळ येथे घडली. अमान सादीक खान (वय 17 रा.कानपूर,ह.मु.सांताक्रूझ, मुंबई) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याला जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.अशी घडली घटनाकानपूर येथील अमान हा आई रिजवाना सादीक खान, बहिण सबा खान, मेहुणा मोहम्मद फैज, अकबर हुसेन,सानिया खान, रेशमा बेगम व दोन लहान मुले हे कानपुर येथील लगA आटोपून पुष्पक एक्सप्रेसने मुंबई येथे जात होते. सर्व जण शेवटच्या जनरल बोगीत बसलेले होते तर अमान हा दरवाजाजवळ मोबाईलवर बोलत उभा होता. मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता या गाडीने भुसावळ स्थानक सोडले. पुढे पुलाजवळ आल्यानंतर रुळाच्या बाजूला हातात काठय़ा घेऊन थांबलेल्या तीन तरुणांपैकी एकाने मोबाईल खाली पाडण्याच्या उद्देशाने अमान याला काठी मारुन फेकली. त्यात अमान हा थेट खाली कोसळला व खडीला खरचटून दोन्ही पाय रेल्वेच्या चाकाखाली आले. हा प्रकार पाहून तरुणांनी तेथून पळ काढला तर गाडीची साखळी ओढून नातेवाईक खाली उतरले.पायाच्या दोन्ही तुकडय़ासह आणले जळगावातअमान याला रक्ताच्या थारोळ्यात पाहून नातेवाईक जागेवरच थरथरायला लागले. स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नातेवाईकांनी त्याचे दोन्ही पाय हातात धरुन आणले. नदीम मलिक, अरिफ अन्सारी, शेख इफ्तेखार, शेख गफ्फार, शेख शाहीद मलिक व वसीम शेख रशीद या जळगाव शहरातील तरुणांनी अमान याला खासगी रुग्णालयात दाखल केले. लगAासाठी गेले होते कानपूरलाअमान व त्याचा परिवार मुळचा कानपुरचाच आहे. मात्र रोजगारामुळे ते मुंबईत स्थलांतर झाले आहेत. सांताक्रुझ येथे चिकनचा त्यांचा व्यवसाय आहे. नातेवाईकाचे लगA असल्याने ते कानपूरला गेले होते. हे लगA आटोपून मुंबईला जात असताना ही घटना घडली. दरम्यान, अमान याने नुकतेच शिक्षण सोडले आहे. व्यवसायात हातभार लावून परिवाराला मदत करत होता. दरम्यान, रेशमा बेगम, सानिया खान व अन्य दोन लहान मुले असे चार जण गाडीतच पुढे निघून गेले. दुपारी त्यांना फोन करुन या घटनेची माहिती देण्यात आली.रेल्वेतून पडल्याने दापो:याचा तरुण जखमीमुंबई-भुसावळ या पॅसेंजरमधून पडल्याने नरेंद्र जगन्नाथ सोनवणे (वय 30 रा.दापोरा, ता.जळगाव) हा तरुण जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. म्हसावद स्थानक सोडल्यानंतर दुपारी चार वाजता हा अपघात झाला. नरेंद्र याचा उजवा पाय घुटण्याजवळ निकामी झाला आहे. परधाडे,ता.पाचोरा येथे तो लगAाला गेला होता. तेथून परत येत असताना ही घटना घडली.कब्रस्थानमध्ये दफन केले पायजळगावातील तरुण, भुसावळ लोहमार्ग पोलीस व नातेवाईकांनी खासगी दवाखान्यातून पायाचे दोन्ही तुकडे घेवून अजिंठा चौक रस्त्यावरील कब्रस्थानात दफन केले. संध्याकाळी उशिरार्पयतही अमान शुध्दीवर आलेला नव्हता. दरम्यान, या घटनेप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त असून त्यातील एक तरुण अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले.