चोरांनी देवाच्या मूर्तीही सोडल्या नाही, घरफोडीत दीड लाखांचे दागिने लंपास

By विजय.सैतवाल | Updated: October 22, 2023 16:12 IST2023-10-22T16:11:46+5:302023-10-22T16:12:42+5:30

गुन्हा दाखल, निमखेडी शिवारात दीड लाखाची घरफोडी

Thieves did not leave even the idols of God jewels worth one and a half lakhs were looted in house burglary | चोरांनी देवाच्या मूर्तीही सोडल्या नाही, घरफोडीत दीड लाखांचे दागिने लंपास

चोरांनी देवाच्या मूर्तीही सोडल्या नाही, घरफोडीत दीड लाखांचे दागिने लंपास

जळगाव : निमखेडी शिवारातील साई पॅलेस येथील विजया चंद्रप्रकाश पद्मावत (४५, रा. साई पॅलेस, निमखेडी शिवार) यांचे बंद घर फोडून सोने-चांदीचे दागिने, मूर्ती असा एकूण एक लाख ५४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी शनिवार, तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजया पद्मावत या कामानिमित्त १३ ऑक्टोबर रोजी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत घरातून सोन्याचे पेंडल, चैन, अंगठी, मंगूळसूत्र, चांदीचा शिक्का व मूर्ती असा एकूण एक लाख ५४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

शुक्रवार, २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी पद्मावत या घरी आल्या तेव्हा हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि नयन पाटील करीत आहेत.

Web Title: Thieves did not leave even the idols of God jewels worth one and a half lakhs were looted in house burglary