कुऱ्हाड येथे दोन ठिकाणी चोरांनी फोडला पोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST2021-09-07T04:21:47+5:302021-09-07T04:21:47+5:30

दहा ते बारा हजार रुपयांची रोख रक्कम व चिल्लर लंपास केली. हॉटेल मालक दुपारी एक वाजता हॉटेलला आल्यानंतर हा ...

Thieves broke into two places at the ax | कुऱ्हाड येथे दोन ठिकाणी चोरांनी फोडला पोळा

कुऱ्हाड येथे दोन ठिकाणी चोरांनी फोडला पोळा

दहा ते बारा हजार रुपयांची रोख रक्कम व चिल्लर लंपास केली. हॉटेल मालक दुपारी एक वाजता हॉटेलला आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत फिर्यादी उमेश सुभाष पाटील याने पिंपळगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये व पाचोरा उपविभागीय अधिकारी भरत काकडे यांनी भेट देऊन तपासकामी सूचना केल्या. जळगाव येथून ठसेतज्ज्ञ व श्वान पथक घटनास्थळी आणण्यात आले होते.

यांनी परिसर पिंजून काढला

मध्यरात्री ३.३० वाजता घरातील महिला उठली असता हा प्रकार उघडकीस आला. तेव्हा गावातील उमेश पाटील, किरण पाटील, विनोद पाटील व पवन पाटील, आदी तरुणांनी संपूर्ण दोन्ही गावांचा परिसर पिंजून काढला; पण चोरटे मिळून आले नाहीत. कालच मजुरीचे पैसे घरात आणले होते. घरातील उमेश पाटील याने बिलदी धरणावरील मजुरांच्या कामाचे मजुरीचे पैसे दीड लाख रुपये पाचोरा पाठबंधारे विभागाकडून वाटण्यासाठी आणले होते, तोच रात्री चोरट्यांनी या पैशांवर डल्ला मारला.

060921\06jal_12_06092021_12.jpg

कुऱ्हाड येथे दोन ठिकाणी चोरांनी फोडला पोळा

Web Title: Thieves broke into two places at the ax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.