दोन्ही लॉकडाऊनमध्ये झाले २२६ नोंदणीकृत विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:11 IST2021-06-30T04:11:44+5:302021-06-30T04:11:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात पहिल्या लॉकडाऊनमध्ये मार्च ते जुलै २०२० मध्ये १०३ नोंदणीकृत विवाह झाले होते. ...

दोन्ही लॉकडाऊनमध्ये झाले २२६ नोंदणीकृत विवाह
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात पहिल्या लॉकडाऊनमध्ये मार्च ते जुलै २०२० मध्ये १०३ नोंदणीकृत विवाह झाले होते. तर यंदा १ एप्रिल ते २८ जून २०२१ या काळात १२३ विवाह हे नोंदणी पद्धतीने झाले आहे.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे विवाह सोहळे थाटात करण्यावर मर्यादा आली आहे. त्यामुळे लहान हॉलमध्ये किंवा मंदिरात विवाह उरकले जात आहे. तसेच अनेक जण नोंदणी पद्धतीने विवाह केले जात आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनचा पहिलाच टप्पा असल्याने पाच महिन्यात १०३ नोंदणीकृत विवाह झाले होते. तर यंदा तीन महिन्यात १२३ नोंदणीकृत विवाह झाले आहेत.
राज्य शासनाने मधल्या काळात निर्बंध कमी केले असले तरी विवाह आणि इतर सोहळ्यांसाठी निर्बंध कमी झाले नव्हते. त्यात विवाहांना फक्त ५० जणांच्या उपस्थितीचा नियम आहे. त्यामुळे कुणाला बोलवायचे कुणाला नाही, या नातेवाईकांच्या रुसव्या फुगव्यात अडकण्यापेक्षा काहींनी नोंदणीकृत विवाह करण्याकडे भर दिला आहे.