शिरसोलीत एस टी स्टँडला जागाच मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:16 IST2021-04-09T04:16:40+5:302021-04-09T04:16:40+5:30
शिरसोली हे गांव जळगांव नांदगाव या महामार्गावर वसले असुन जळगांव पासुन नऊ किमी अंतरावर आहे. शिरसोली प्र.न. व प्र.बो. ...

शिरसोलीत एस टी स्टँडला जागाच मिळेना
शिरसोली हे गांव जळगांव नांदगाव या महामार्गावर वसले असुन जळगांव पासुन नऊ किमी अंतरावर आहे. शिरसोली प्र.न. व प्र.बो. या दोन्ही गांवांची लोक संख्या ही ३० ते ३५ हजारांच्या घरात आहे. महामार्ग हा दोन्ही शिरसोली गांवाच्या मध्यातुन गेला असुन या महामार्गाचे काम गांवाच्या हद्दीत पूर्ण झाले आहे. यामुळे उजव्या व डाव्या बाजुस एस टी. स्टँड बांधणे ठेकेदारास बंधनकारक आहे. परंतु या महामार्गावर भर रस्त्यावर काही नागरिकांनी पक्के व टपऱ्या टाकुन मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. या मुळे उजव्या बाजूच्या एस टी स्टँडला जागाच शिल्लक नसल्याने प्रवाशांना ऐन उन्हात ताटकळत उभे रहावे लागत आहे. तसेच या ठिकाणी वाहनांची नेहमीच वर्दळ असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर बाबीकडे महामार्ग विभागाचे पुर्ण दुर्लक्ष होत आहे. महामार्ग विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे.
-------------------------
मक्तेदार एस टी. स्टँड उभारण्यास तयार आहे. परंतु खाजगी जागेवर कुणी एस टी.स्टँड उभारु देत नाही. शासनाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. निवा-यास जागा न मिळाल्यास काम अर्धवट सोडुन देऊ असा ईशाराही मक्तेदाराने दिला आहे.