indpendece day पहिल्या ध्वजारोहणास प्रचंड उत्साहाचे वातावरण होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:17 AM2018-08-15T01:17:06+5:302018-08-15T01:18:43+5:30

मोतीलाल गुजराथी : चोपडा शहरात होता मोठा उत्साह

There was a huge enthusiasm for the first clown | indpendece day पहिल्या ध्वजारोहणास प्रचंड उत्साहाचे वातावरण होते

indpendece day पहिल्या ध्वजारोहणास प्रचंड उत्साहाचे वातावरण होते

Next


संजय सोनवणे
चोपडा, जि.जळगाव : महात्मा गांधींनी स्वतंत्र भारत होण्यासाठी चले जाव चळवळ, भारत छोडो आंदोलन, मिठाचा सत्याग्रह यासह असंख्य आंदोलने पुकारली. या आंदोलनाचा प्रभाव आमच्याही मनावर झाला आणि आम्ही शालेय शिक्षण घेत असतानाच महात्मा गांधीजींच्या चळवळीत सहभागी झालो, अशी भावना स्वातंत्र्य सैनिक मोतीलाल कन्हैयालाल गुजराथी यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्य दिनाचा प्रथम झेंडावंदन कार्यक्रम चोपडा शहरात अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा झाला होता व तत्कालीन मामलेदार यांच्या हस्ते तहसील कार्यालय आवारात प्रथम झेंडावंदन झाल्याचेही त्यांनी सांगितले.
चळवळीविषयी सांगताना ते म्हणाले, महात्माजींनी सत्याग्रह पुकारला त्यावेळी आम्ही पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होतो. वर्गातच दप्तर सोडून आम्ही सत्याग्रहात सहभागी झालो. तेव्हाच्या मामलेदारांनी आम्हास समजवण्याचा खूप प्रयत्न केला. तुम्ही लहान आहात, तुम्ही येथून निघून जा, तुम्हाला आम्ही सोडून देतो, तुमच्या वडिलांची इस्टेट जमा होईल, असाही आम्हाला त्या काळात धाक दाखविण्यात येत होता. मात्र आम्ही ठामपणे सांगितले की, जर आम्हाला स्वातंत्र्य मिळेल तर इस्टेट जमा होण्याचा विषयच येत नाही. तेव्हा प्रचंड उत्साह असल्याने सर्व शाळा आम्ही ओस पाडल्या. दररोज सकाळी मिरवणूक काढायचो आणि जनजागृती करायचो.
मामलेदार आणि फौजदाराने पकडून हे ऐकणार नाही म्हणून त्या काळात चार महिने धुळे येथील जेलमध्ये ठेवले होते. तसेच त्यावेळी चोपड्यात स्वातंत्र्य मिळणार यानिमित्ताने मगनलाल नगीनदास गुजराथी आणि गोवर्धनदास भिकारीदास गुजराथी यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण केली होती.
त्यावेळी माझे वडील कन्हैयालाल गुजराथी यांना जळगाव येथील कलेक्टरने विचारले की, गावात परिस्थिती कशी आहे? त्याच काळात गोवर्धनदास गुजराथी यांना उचलण्यात येणार होते. मात्र माझ्या वडिलांनी ठणकावून सांगितले की, त्यांना जर तुम्ही उचलले तर शांतता बिघडू शकते, ते आहेत म्हणूनच शांतता आहे.

Web Title: There was a huge enthusiasm for the first clown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.