शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

इंधनाच्या दराकडे लक्षच नसल्याने आवाज उठेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 10:18 PM

विजयकुमार सैतवालदररोज वाढणाऱ्या इंधनाच्या दराने सर्वांचे गणित विस्कटत असले तरी त्याबाबत आवाज उठविला जात नसल्याचे चित्र नेहमीच दिसून येते. याला कारण ठरते ते लीटरप्रमाणे इंधन न भरता सरसकट रकमेप्रमाणे इंधन भरणे. त्यामुळे इंधनाचे दर कुठपर्यंत पोहचले याकडे सहजासहजी लक्ष दिले जात नाही व त्याबाबत कोणी बोलत नाही, असे जाणकारांचे म्हणणे ...

विजयकुमार सैतवालदररोज वाढणाऱ्या इंधनाच्या दराने सर्वांचे गणित विस्कटत असले तरी त्याबाबत आवाज उठविला जात नसल्याचे चित्र नेहमीच दिसून येते. याला कारण ठरते ते लीटरप्रमाणे इंधन न भरता सरसकट रकमेप्रमाणे इंधन भरणे. त्यामुळे इंधनाचे दर कुठपर्यंत पोहचले याकडे सहजासहजी लक्ष दिले जात नाही व त्याबाबत कोणी बोलत नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर वाढण्यासह भारतीय रुपयातील घसरण यामुळे भारतात इंधनाचे दर सातत्याने वाढत असून आता पेट्रोल ९१.५० रुपये प्रती लीटर झाले आहे.दररोज आठ पैसे ते ८० पैसे या प्रमाणे वाढ होत जाऊन दोन महिन्यात पेट्रोलचे दर ६.८२ रुपये व डिझेलचे दर जवळपास आठ रुपये प्रती लीटरने वाढले आहे. रुपयाच्या घसरणीमुळे हा परिणाम होत असल्याचे सांगितले जात असले तरी सरकारकडून उपाययोजना होत नसल्याच्या आरोप होण्यासह सामान्यांचे कंबरडे यामुळे मोडले जात आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर कमी असले तरी आॅगस्ट महिन्यात भारतामध्ये इंधनाचे दर वाढत गेले. आता त्यात भरात भर म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर ८०डॉलर प्रती बॅरल झाल्याने दरवाढीस मदत होत आहे.दररोज इंधनाच्या दर बदलाच्या निर्णयात तर आॅगस्ट महिन्यापासून दरवाढ सातत्याने सुरू आहे. या बाबत इंधन विक्रेत्यांकडून माहिती जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांची मोठी घसरण होत असल्याने भारतात इंधन दरवाढ कायम आहे. रुपयाची ऐतिहासिक घसरण होऊन डॉलरचा दर तब्बल ७२.१० रुपयांवर गेला आहे. दिवसेंदिवस रुपयांतील या घसरणीमुळे व आता कच्च्या तेलाचेही भाववाढीमुळे इंधनाचे दर वाढत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मध्यंतरी रुपया सावरण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी इंधनाचे दर स्थिर असल्याचेही यात दिसून येते.मात्र इंधन दरवाढीसाठी जनतेने आवाज उठविणे गरजेचे असल्याचा सूर आहे. ज्या वेळी लीटरप्रमाणे इंधन भरले जाईल, तेव्हा दररोज अथवा आठवडाभरात इंधनाचे दर किती वाढले हे लक्षात येऊ शकते, मात्र वाहनधारक लीटरप्रमाणे इंधन न भरता वाहन घेऊन आले की, ते थेट १०० रुपये, २०० रुपये अथवा ५०० रुपये तसेच १००० रुपये या प्रमाणे रकमेनुसार इंधन भरताना दिसून येतात, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. यामुळेच इंधन दरवाढ लक्षात नाही, असे एकूणच स्थिती वरून दिसून येते.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपJalgaonजळगाव