शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

बळीराजाला दिलासा नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 5:00 PM

मालाला भाव मिळत नसल्याने बळीराजा मेटाकुटीस

विजयकुमार सैतवाल, जळगावजळगाव : भाजीपाला उत्पादक शेतकरी असो की कांदा उत्पादक अथवा कडधान्य उत्पादक शेतकरी, या कोणालाच्याच मालाला भाव मिळत नसल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे. हंगामात माल हाती पुरेसा माल आला असली तरी त्यास भाव मिळत नसल्याने कांदा, टमाटे मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असून चांगले उत्पादन येत असल्याने बळीराजा खूष तर आहे, मात्र बाजारात हाच भाजीपाला आणल्यानंतर त्यास भाव मिळत नसल्याने तो हैराण होत आहे.गेल्या आठवड्याच्या तुलनेत टमाट्याच्या भावात ३०० रुपये प्रती क्विंटलने घट होऊन लाल टमाटे ७०० रुपये प्रती क्विंटलवरून ४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ८५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या कांद्याचे भाव कमी होऊन ते ७५० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. भेंडीचे भाव ५०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ते १५००, कारल्याचे भाव ३०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ते १५०० रुपयांवर आले आहेत. या सोबतच गेल्या आठवड्यापासून वांग्याची आवक वाढलेली असून वांग्याचे भाव ५०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे. कोथिंबीरचेही २५०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. पत्ता कोबी २० रुपये प्रती किलो, फूलकोबी ३० रुपये प्रती किलो, हिरवी मिरची २० रुपये प्रती किलो, मेथीची भाजी १० रुपये जुडी विक्री होत आहे. त्यामुळे एवढा माल येऊनही अपेक्षित रक्कम बळीराजाच्या हाती पडत नसल्याचे चित्र आहे.अशाच प्रकारे दोन आठवड्यांपूर्वी ७५०० ते ८००० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाच्या डाळीच्या भावात घट होऊन ती ७००० ते ७४०० रुपयांवर आली आहे. उडीदाच्या डाळीचे भाव ६००० ते ६३०० रुपये प्रती क्विंटल, हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६००० ते ६४०० रुपये प्रती क्विंटलवर आहेत. तूरडाळीचेही भाव ७००० ते ७४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे.गव्हामध्येही १४७ गहू २६५० ते २७५० रुपये प्रती क्विंटल, लोकवन गहू २५५० ते २६०० रुपये, शरबती गहू २७५० ते २८५० रुपये प्रती क्विंटल, चंदोसी ३८५० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर आले आहे. 

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव