शिरसोलीत पडलेल्या प्लास्टरची चौकशी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST2021-02-05T05:54:10+5:302021-02-05T05:54:10+5:30

शिरसोली प्र. बो. : येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीच्या छताचे प्लास्टर सहा महिन्यांत चार वेळा कोसळले असले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ...

There is no inquiry into the plaster that fell on the head | शिरसोलीत पडलेल्या प्लास्टरची चौकशी नाही

शिरसोलीत पडलेल्या प्लास्टरची चौकशी नाही

शिरसोली प्र. बो. : येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीच्या छताचे प्लास्टर सहा महिन्यांत चार वेळा कोसळले असले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची साधी दखल घेतली नाही. यामुळे ग्रामस्थांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे बांधकाम नुकतेच १७ लाख रुपये खर्च करून करण्यात आले आहे. परंतु या इमारतीच्या छताचे प्लास्टर गेल्या सहा महिन्यांत चार वेळा कोसळले आहे. सोमवारी तर ग्रामपंचायत कर्मचारी संगणक कक्षात काम करीत असताना सकाळी ११ वाजता प्लास्टर कोसळले. तीन कर्मचारी यातून थोडक्यात बचावले.

या इमारतीचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून प्लास्टर पडले असले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची साधी दखलही घेतली नसून मोठी दुर्घटना घडण्याची अधिकारी वाट तर पाहत नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. ठेकेदार व मूल्यांकन करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे का, असा सवाल केला जात आहे.

Web Title: There is no inquiry into the plaster that fell on the head