शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराच्या उद्घाटनानंतर, परतांना गोध्रा घडवण्याचा डाव असू शकतो; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 17:12 IST

Uddhav Thackeray Speech Jalgaon : उद्धव ठाकरे म्हणाले, हरणार म्हणजे हारणारच... २०२४ नंतर हे सरकार केंद्रात आणि देशात राहत नाही, ठेवायचं नाही.

येणाऱ्या २०२४ नंतर हे सरकार केंद्रात आणि देशात राहत नाही, ठेवायचं नाही. हरणार म्हणजे हारणारच. हे त्यांनाही कळलेले आहे. आता लोक बोलायला लागले आहेत. त्यांच्या समोर आता दोनच पर्याय आहे. एक तर, सत्यपाल मलिक आणि महुआ मोइत्रा यांनी सांगितलेला, तो सर्वात घातक पर्याय आहे. सत्यपाल मलिक म्हणाले की, तो पुलवामातील हल्ला यांनीच घडवला होता. म्हणजे तुम्ही निवडणुकीसाठी माझ्या देशातील जवानांच्या जीवाशी खेळत आहात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजप केला आहे. एवढेच नाही, तर राम मंदिराच्या उद्घाटनानंतर, परतांना गोध्रा घडवण्याचा डाव असू शकतो, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. ते जळगाव येथे एका सभेला संबोधित करत होते.

युद्ध हे देशासाठी करायचे असते, निवडणुकीसाठी नाही -"जो जवान या भारत मातेच्या रक्षणासाटी गोळी खायला तयार असतो. त्याचा जीव तुम्ही तुमच्या राजकारणासाठी घेऊ शकता. सर्जिकल स्ट्राइकसुद्धी  तुम्ही करू शकता?  युद्ध हे देशासाठी करायचे असते, निवडणुकीसाठी नाही. सैन्य, जवान हे देशासाठी असतात, ते तुमच्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नसतात," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरे म्हणाले, "ते एकतर तसा तमाशा करू शकता किंवा त्याही पेक्षा जो घातक मुद्दा सत्यपाल मलिक आणि महुआ मोइत्रा यांनी सांगितलाय, की येत्या काही दिवसांत राम मंदिराचं उद्घाटन होईल. तारीख ठरतेय. मला कुणी सांगितले की, शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवाशी २३ जानेवारीला करतायत. म्हटले चांगले आहे, स्वागत आहे, पण डाव असा असू शकतो की, राम मंदिरासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने हिंदू बोलवायचे. बस गाड्या ट्रेनमधून यायचं आणि कार्यक्रम झाल्यानंतर, परततांना मधेच कुठे तरी गोध्रा घडवायचा. करू शकतात, हल्ला होऊ शकतो. कोणत्या तरी वस्तीत बस जाळतील, दगडफेक करतील, माणसं मारतील. पुन्हा देश पेटेन, पुन्हा घरांच्या होळ्या पेटतील आणि त्या पेटलेल्या घरांच्या होळ्यांवर त्यांच्या राजकीय पोळ्या ते भाजतील. हे सर्व त्यांचे डावपेच आहेत." 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAyodhyaअयोध्या