शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

बेरजेचे राजकारण करताना काहींवर अन्याय होतच असतो : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 14:18 IST

कोणावर अन्याय करण्याचा हेतू नव्हता. बेरजेचे राजकारण करताना काहींवर अन्याय होतच असतो, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपा उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी केले.

ठळक मुद्देग्रामदैवत श्रीराम मंदिरात श्रीफळ वाढून प्रचाराला सुरुवातजळगावात भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभजय श्रीरामाच्या जयघोषात प्रचार फेरीला प्रारंभ

जळगाव : कोणावर अन्याय करण्याचा हेतू नव्हता. बेरजेचे राजकारण करताना काहींवर अन्याय होतच असतो, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपा उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी केले. जुन्या गावातील ग्रामदैवत श्रीराम मंदिरात श्रीफळ फोडून प्रचारास सुरुवात केली.प्रभाग क्रमांक ३,४,१७ या प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात सर्वप्रथम झाली. रविवारी सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान जयश्रीरामच्या घोषात प्रचार फेरीस सुरुवात झाली.आमदार सुरेश भोळे व चंदूलाल पटेल, माजी महापौर ललित कोल्हे, वामनराव खडके, कैलास सोनवणे आदींसह उमेदवार मीना धुडकू सपकाळे, दत्तात्रय देवराम कोळी, रंजना भारत सपकाळे, प्रवीण रामदास कोल्हे, चेतन गणेश सनकत, भारती कैलास सोनवणे, चेतना किशोर चौधरी, मुुकुंदा भागवत सोनवणे, मिनाक्षी गोकुळ पाटील, रंजना वानखेडे, सुनील वामनराव खडके, विश्वनाथ खडके उपस्थित होते.त्यामुळे निधी खर्च होवू शकला नाही- सुरेश भोळेशहराच्या विकासासाठी मी २५ कोटीचा निधी मिळवला मात्र हा निधी कोणामुळे खर्च होवू शकला नाही, हे जनतेला माहीत आहे,असे आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी सांगितले. तसेच हा पैसा केवळ विकासासाठी खर्च करायचा असताना तो इतरत्र वळविण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे निधी खर्च होवू शकला नाही, अन्यथा आणखी ५० कोटी मिळाले असते असेही आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी सांगितले.युती तुटल्याने अर्धा विजय आताच झालाभाजपाच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने नागरिकांचीही इच्छा नव्हती की युती व्हावी. यामुळे युती तुटल्याचा सर्वांनाच आनंद असून युती तुटल्याने अर्धा विजय आताच झाला, असे प्रतिपादन आमदार भोळे यांनी संकल्प मेळाव्यात केले.पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खडसे हे अनुपस्थितप्रचाराच्याशुभारंभास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची उपस्थित राहतील असे जाहीर करण्यात आले होते मात्र हे दोन्ही नेते यावेळी उपस्थित नव्हते.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनJalgaonजळगाव