साडेपाच हजारावर मतदारांचे छायाचित्र नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:15 IST2021-03-28T04:15:22+5:302021-03-28T04:15:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मतदार यादीमध्ये मतदाराचे छायाचित्रही आवश्यक असल्याने छायाचित्रे नसलेल्या मतदारांचे छायाचित्र संग्रहित करण्याचे काम सुरू ...

साडेपाच हजारावर मतदारांचे छायाचित्र नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मतदार यादीमध्ये मतदाराचे छायाचित्रही आवश्यक असल्याने छायाचित्रे नसलेल्या मतदारांचे छायाचित्र संग्रहित करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये ५८४० मतदारांचे छायाचित्र नाही. त्यांना नोटीस देऊन छायाचित्र मागवले जाणार असून तरीदेखील ते उपलब्ध न झाल्यास नावे वगळली जाऊ शकतात.
मतदार यादी व मतदार ओळखपत्रावर मतदाराचे ओळखपत्र असावे, यातून त्याची ओळख होते यासाठी छायाचित्र सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र तांत्रिक अथवा इतर कारणांमुळे अनेक मतदारांचे नाव नोंदणी नंतरही छायाचित्र नसते. अशाच प्रकारे यंदा अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये १९ हजार २७१ जणांचे छायाचित्र नसल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधितांना नोटीस पाठवून छायाचित्र मागविण्यात आले. यात. १७८२ जणांचे छायाचित्र जमा झाले. १२५०५ जणांचे नावे वगळण्यात आली आहे. अजूनही ५८४० मतदारांचे छायाचित्र उपलब्ध नसून त्यांना नोटीस पाठवून छायाचित्र मागविले जाणार आहे. तरीदेखील ते उपलब्ध न झाल्यास त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जातील.
चोपडा व रावेर मतदार संघात १०० टक्के छायाचित्र
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांचा विचार केला असता यामध्ये चोपडा व रावेर विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारांच्या संख्येएवढी सर्वांची छायाचित्रे उपलब्ध आहे. त्यामुळे छायाचित्र असलेली १०० टक्के मतदार यादी या दोन मतदारसंघातील आहे.
जिल्ह्यातील एकुण मतदार - ३४२८२६०
छायाचित्र नसलेले मतदार - ५८४०
फोटो संग्रहित केलेल्या मतदारांची संख्या - १७८२
वगळणी केलेली संख्या - १२५०५
मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून छायाचित्र मागवून यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. ज्यांचे छायाचित्र नाही अशा मतदारांना नोटीस पाठवून छायाचित्र संकलित केले जाते. तरी देखील त्यांच्याकडून छायाचित्र उपलब्ध झाले नाही तर मतदार यादीतून संबंधितांचे नाव वगळण्यात येते.
- तुकाराम हुलवळे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी
विधानसभा निहाय आकडेवारी
मतदार संघ - एकुण मतदार - छायाचित्र नसलेले मतदान
चोपडा -३०९१५३- ००
रावेर - २९११८५- ००
भुसावळ - ३०२९१८- १२७०
जळगाव शहर - ३८६५६९ -२१०
जळगाव ग्रामीण - ३११२३७- ४२१
अमळनेर -२९१९८४- ६२
एरंडोल -२७८२७१-२५९
चाळीसगाव -३५००२३- ०२
पाचोरा - ३१०३३६-२०५४
जामनेर - ३०८५२३- ६२०
मुक्ताईनगर - २८८०६१- ९४२