बोदवडमध्ये चोऱ्यांचे सत्र थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 17:37 IST2020-07-24T17:35:10+5:302020-07-24T17:37:24+5:30
शहरातील चोºया काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे.

बोदवडमध्ये चोऱ्यांचे सत्र थांबेना
बोदवड, जि.जळगाव : शहरात चोरट्यांनी आता लहानसहान दुकानांनाही लक्ष्य करणे सुरू केले असून, शहरातील चोºया काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. सहा दिवसात तिसऱ्यांदा दुकाने फुटले आहे. चहाच्या दुकानातून चोरट्यांनी १० हजारांचा मुद्देमाल लांबवला.
शहरातील मुख्य रस्त्यावर पक्क्या इमारतीत असलेले चहाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. या दुकानातून वीस किलो चहापत्ती पावडर, सहा लीटर दूध, पाच किलो साखर तसेच एक मोबाइल व रोख हजार रुपयांची चिल्लर व काही खाद्य साहित्य घेऊन असा सुमारे १० हजारांपर्यंतचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला.
शहरात नगरपंचायतीने ठिकठिकाणी पाच लाख रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून त्याचे नियंत्रण पोलीस ठाण्यात आहे. त्यामुळे चोरी करणारा सहज पोलिसांच्या दृष्टीस पडत नसावा काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सततच्या चोरीच्या घटनांनी व्यापाºयांसह नागरिक धास्तावले आहेत.
या प्रकाराबाबत दुकानदार आशिष सुरेश बडगुजर यांनी बोदवड पोलिसनाकडे फिर्याद दिली आहे.