पाळधी येथे नऊ लाखाच्या टायरची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:25 IST2019-03-12T23:25:22+5:302019-03-12T23:25:34+5:30
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

पाळधी येथे नऊ लाखाच्या टायरची चोरी
पाळधी, ता. धरणागाव - पाळधी येथे टायरच्या गोदामातून ९ लाख ३५ हजार १८९ रुपये किंमतीचे टायर व इतर साहित्य चोरीस गेले असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, ११ मार्च रोजी रात्री साडे आठ ते १२ रोजी सकाळी साडे नऊ वाजेदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पाळधी येथे टायरच्या गोदामातून ९ लाख २० हजार ९८९ रुपये किंमतीचे टायर व १४ हजार २०० रुपये किंमतीचे सीपीयू, सीसीटीव्ही, डिव्हीआर, नेट राऊटर चोरीस गेले. या प्रकरणी सदाशिव निंबा मराठे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.