नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वीच चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:28+5:302021-09-08T04:21:28+5:30
सैय्यद सईद अली आबीद अली हे फातेमानगरात भाडे करारावरील खोलीत कुटुंबासह वास्तव्यास आहेत. चादर विक्रीचे काम करतात. याच घरापासून ...

नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वीच चोरी
सैय्यद सईद अली आबीद अली हे फातेमानगरात भाडे करारावरील खोलीत कुटुंबासह वास्तव्यास आहेत. चादर विक्रीचे काम करतात. याच घरापासून एक किलोमीटर अंतरावर लेक व्हिव कॉलनी येथे सैय्यद सईद अली यांनी नवीन घर घेतले आहेत. या घरात त्यांनी रविवारी जुन्या घरातील साहित्य टाकले. चोरट्यांनी मध्यरात्री बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सोने, चांदीचे दागिने व ५ हजार रुपये रोख असा एकूण ६० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सोमवारी सईद अली तसेच त्यांच्या आई शकिलाबी या नवीन घरी आल्या असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. सैय्यद अली यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, सईद अली यांच्या घराच्या बाजुला बंगला आहे. या बंगल्याच्या खिडक्याही चोरट्यांनी तोडल्या आहेत. मात्र, कुलूप मजबूत असल्याने ते तुटले नाही. याठिकाणी प्रयत्न असफल झाल्याने चोरट्यांनी सईद अली यांचे घर लक्ष्य करून ऐवज लांबविल्याची माहिती समोर आली आहे. सहाय्यक फौजदार रवींद्र तायडे तपास करीत आहेत.