पाझर तलावातून विद्युत पंपाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:15 IST2021-05-01T04:15:01+5:302021-05-01T04:15:01+5:30

जळगाव : तालुक्यातील पिंम्पडी शिवारातील पाझर तलावात लावलेली १७ हजार रुपये किमतीची विद्युत पंप आणि इलेक्ट्रिक मोटार अज्ञात चोरट्यांनी ...

Theft of electric pump from seepage pond | पाझर तलावातून विद्युत पंपाची चोरी

पाझर तलावातून विद्युत पंपाची चोरी

जळगाव : तालुक्यातील पिंम्पडी शिवारातील पाझर तलावात लावलेली १७ हजार रुपये किमतीची विद्युत पंप आणि इलेक्ट्रिक मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धानवड येथील जयेश पांडुरंग पाटील यांचे पिंम्पडी शिवारात शेत आहे. शेतापासून जवळ असलेल्या पाझर तलावात विद्युत पंप लावलेले आहे. या पंपाद्वारे शेतीला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, तो पंप अज्ञात चोरट्याने चोरून नेला. हा प्रकार गुरुवारी उघडकीस येताच, तलावाजवळ पाहणी केली असता, चोरट्याने हजार रुपये किमतीचे विद्युत पंप आणि स्टार्टर चोरून नेल्याचे पाहायला मिळाले. अखेर जयेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष पवार करीत आहे.

Web Title: Theft of electric pump from seepage pond