अक्सानगरातून बांधकाम साहित्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:15 IST2021-03-06T04:15:41+5:302021-03-06T04:15:41+5:30

जळगाव : अक्सानगर परिसरातील ईकबाल कॉलनी येथून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेल्याची घटना ...

Theft of construction materials from Aksanagar | अक्सानगरातून बांधकाम साहित्याची चोरी

अक्सानगरातून बांधकाम साहित्याची चोरी

जळगाव : अक्सानगर परिसरातील ईकबाल कॉलनी येथून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्सानगर येथील रहिवासी मुबस्सिर शेख सादीक हे सेंट्रिंग काम करतात. त्यांच्याकडे बांधकामासाठी लागणारे साहित्य आहेत. त्यात स्लॅबसाठी लागणाऱ्या लोखंडी प्लेटांचाही समावेश आहे. त्यांचे अक्सानगरातीलच इकबाल कॉलनीत बांधकाम सुरू होते. त्यावेळी १५ जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे २० हजार रूपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेले. हा प्रकार १६ रोजी उघडकीस आल्यानंतर शेख यांनी बांधकाम साहित्याचा शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाही. अखेर एक ते दीड महिन्यानंतर गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.

Web Title: Theft of construction materials from Aksanagar