शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

रंगभूमीचा नायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 14:18 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘वेध नाटकाचा’ या सदरात रंगभूमीचे अभ्यासक डॉ.हेमंत कुलकर्णी लिहिताहेत...

नायक म्हटला की डोळ्यासमोर एक धिरोदात्त व्यक्तिमत्त्व उभे राहते. भव्य देहयष्टी, देखणा चेहरा, धारदार नजर, चपळ हालचाल, करडा स्वर इ. असे अनेक गुणांनी युक्त असा नायक आपल्या डोळ्यासमोर येतो. कारण तसंच आहे. आजवर आपण पाहिलेल्या सिनेमा, नाटकातून नायक असेच असायचे आणि आहेत आणि अशा नायकाची दाखवलेली कॉमेडी, ट्रॅजेडी ही प्रेक्षकांना भावते. सर्वसामान्य दिसणाऱ्या आणि असणाºया नायक नामे व्यक्तीची ट्रॅजेडीही तेवढी उदात्त वाटत नाही. कारण सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यात असं काही घडतच नाही, असा एक सर्वमान्य समज; तर असा नायक सतत कलाकृतीतून बघण्याची आम्हाला सवय आहे. त्यामुळे नाटक असो की सिनेमा याचा नायक कोण, हा प्रश्नच खरेतर उद्भवायला नको.नायक म्हणजे कोण? तर जो त्या कथानकातील प्रमुख अशी व्यक्ती, जिच्याभोवती नाटकाचे कथानक गुंफलेले असते. त्या कथेत घडणाºया प्रत्येक गोष्टीला तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जबाबदार असतो. पण या नायकाबाबत जरा आर्थिक वेगळा विचार केला तर असे लक्षात येते की, हा नायक नसून त्या कलाकृतीतील शेवटची व्यक्ती आहे. एखाद्या शोरूममधील विंडोमध्ये ठेवलेल्या शो पीससारखी आहे. कारणही तसंच आहे. या नायकाचे किंवा त्या कलाकृतीत वावरणाºया कोणत्याही भूमिका करणाºया नटाचे/नटीचे स्थान हे शेवटचे आहे. कारण असे की तो जे काही संवाद म्हटतो ते दुसºयाने लिहिलेले असतात. त्याला दिलेल्या हालचाली या दिग्दर्शकाच्या असतात. त्याच्या भोवती उभे केलेले वातावरण हे नेपथ्यकाराने निर्माण केलेले असते. त्याच्या अंगावर चढवलेले कपडे हे वेशभूषाकाराने दिलेले असतात. त्याच्या चेहºयावर रंग हा रंगभूषाकार लावतो. रंगमंचावर त्याच्यावर प्रकाश टाकतो. तो प्रकाशयोजनाकार त्याच्या संवादांना, भावनाप्रकटनाला उठाव देतो तो संगीतकार. या सगळ्यांची मदत घेत तो आपली कला प्रगट करतो. यातला एक जरी घटक वगळला तर त्याचे अभिनय नामक कार्य अपूर्ण राहते.मग पुन्हा प्रश्न येतो की मग नायक कोण? तर या नायकाचा नायक हा त्या नाटकाचा लेखक आहे. जो प्रेक्षकांना दिसत नाही पण ही सर्व नाट्यकृती ज्याची खरी सृजनशिल निर्मिती असते तो नायक आहे. जो नाटक जन्माला घालतो, ते नाटक मनाच्या रंगमंचावर सर्वप्रथम तो पहातो आणि मग आपल्या शब्दांच्या माध्यमातून तो कागदावर साकारतो. त्याचे हे कार्य केवळ लिहून संपत नाही तर जेव्हा हे रंगमंचावर प्रत्यक्ष जेव्हा सादर होते तेव्हा त्यास पूर्णत्व येते. त्या नाटकात काम करणारे नट, तंत्रज्ञ हे बदलत जातात पण लेखक मात्र तोच असतो. काळाच्या ओघात असे नट विस्मरणातही जातात, पण नाटक ही कागदावर लिहून ठेवलेली कलाकृती ही अजरामर असते.आजही संस्कृत रंगभूमीवर, ग्रीक रंगभूमीवर, पाश्चिमात्य रंगभूमीवर सादर झालेल्या एवढंच काय तर जगातील कोणत्याही भाषेतील रंगभूमीवरील लिखित नाटकांच्या संहिता आपण वाचू शकतो, शेक्सपिअरची नाटके आजही आपल्याला सहज उपलब्ध आहेत. पण याच नाटकांमधून भूमिका केलेल्या नटांच्या फारतर आठवणी (अर्थात त्या कोणी लिहिल्या/चित्रित केल्या असतील तर) जागवता येतात. अलीकडच्या आधुनिक तंत्रज्ञानाने नाटकाचे चित्रीकरण करून ठेवता येते जे की पुढच्या पिढीला बघता येईल. पण त्या पुनर्निर्मितीची प्रक्रिया नसते.लेखकाच्या नाटकावर अशी निर्मितीची प्रक्रिया वारंवार करता येते. अर्थात ते त्या नाट्यकृतीच्या गुणवत्तेवर त्यातील समकालीन मूल्यांवर अवलंबून आहे आणि म्हणूनच नाटकाचा खरा नायक हा त्या नाटकाचा लेखक आहे. त्याची सर्वमान्य कलाकृती ही त्याच्या पृथ्वीतलावरील अस्तित्वाची खरी निशाणी आहे. अनेक नट येतील जातील, अनेक दिग्दर्शक, तंत्रज्ञांचे थोर कार्य विस्मरणात जाईल पण रंगभूमीच्या या लेखक रूपी नायकाचे स्थान या कलेच्या जगात चिरंतन आहे व राहील.-डॉ.हेमंत कुलकर्णी, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव