चाळीसगावला शस्त्राचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 12:45 IST2018-01-20T12:43:05+5:302018-01-20T12:45:29+5:30

पहाटे तीन वाजेची घटना

Theaf case on petrol pumps | चाळीसगावला शस्त्राचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर जबरी चोरी

चाळीसगावला शस्त्राचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर जबरी चोरी

ठळक मुद्देवाघडू येथे दोन घरेही फोडली बॅटरी काढून फेकून दिल्या

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जळगाव, दि. 20-  नांदगाव रोडवर हिरापूर गावाजवळील दोनच दिवसांपूर्वी सुरु झालेल्या   पेट्रोलपंपावर शनिवारी पहाटे तीन वाजता चार चोरटय़ांनी शस्त्रांचा धाक दाखवून रोकड लुटली. 
  पेट्रोलपंप गुरुवारी सुरु झाला. शनिवारी पहाटे तीन वाजता एका चार चाकी गाडीत चार चोरटे पेट्रोल पंपावर आले. सुरक्षारक्षकाला मारहाण करुन नंतर इतर कर्मचा-यांना चाकू आणि टॉमीचा धाक दाखविला. कॅबिन उघडून  आठ ते दहा हजाराची रोकड हिसकावून घेतली. यावेळी कर्मचा-यांनी मोबाईलवर कुणाशी संपर्क साधू नये म्हणून त्यांच्या बॅटरी काढून फेकून दिल्या. 
पुरावा हाती लागू नये म्हणून सीसीटीव्हीचे रेकॉर्डर घेऊन चोरटय़ांनी नांदगावच्या दिशेने धूम ठोकली. पंपाचे मालक सुनिल भावसार यांनी ग्रामीण पोलिसांना पहाटेच कळविले. त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी अरविंद पाटील, पो.नि. भाऊसाहेब पटारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
वाघडू येथे दोन घरेही फोडली 
चाळीसगाव शहरापासून पाच कि.मी. अंतरावर पूर्वेला असणा-या वाघडू येथे नव्या गावातील अवचित गबा पाटील आणि केशव गरबड पाटील यांच्या घरचा कडी - कोयंडा तोडून चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री सोन्याचे दागिने व रोकड रक्कम लांबवली. 
शनिवारी सकाळी चाळीसगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 

Web Title: Theaf case on petrol pumps