विक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी चांदीत १६०० रुपयांची घसरण, सोनेही ७०० रुपयांनी घसरले
By विजय.सैतवाल | Updated: April 15, 2023 15:39 IST2023-04-15T15:38:38+5:302023-04-15T15:39:16+5:30
गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

विक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी चांदीत १६०० रुपयांची घसरण, सोनेही ७०० रुपयांनी घसरले
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : सोने-चांदीच्या विक्रमी भावानंतर शनिवार, १५ एप्रिल रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार ६०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी ७५ हजार ९०० रुपये प्रति किलोवर आली. सोन्याच्याही भावात ७०० रुपयांची घसरण होऊन ते ६० हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यात शुक्रवार, १४ एप्रिल रोजी सोने थेट ६१ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते. चांदीदेखील दोन वर्ष आठ महिन्यांनंतर पुन्हा एकदा ७७ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली होती. मात्र सटोडींनी चांदीची विक्री सुरू केल्याने तिच्या भावात एक हजार ६०० रुपयांची घसरण झाली. पुढील आठवड्यात अक्षय्य तृतीया असल्याने या मुहूर्तावर सोने-चांदीचे काय भाव राहणार, याकडे ग्राहकांसह सराफ व्यावसायिकांचेही लक्ष लागलेले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"