लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : दोन लाखांच्या घरात पोहोचलेल्या चांदीचे भाव सात दिवसांत तब्बल ३३ हजार रुपयांनी घसरले आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, मंगळवारी तर चांदीच्या भावात आठ हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी एक लाख ६२ हजार रुपयांवर आली.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भाववाढ होत गेलेल्या चांदीने १४ ऑक्टोबर रोजी १ लाख ९५ हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर मात्र, चांदीचे भाव उतरत आहेत.
सोन्याच्या भावात ६०० रुपयांची वाढ
चांदीच्या भावात घसरण होत असताना सोन्याच्या भावात मात्र वाढ होत आहे. मंगळवारी सोन्याच्या भावात ६०० रुपयांची वाढ होऊन ते प्रतितोळा १ लाख २९ हजार रुपयांवर पोहोचले.
असे घसरत गेले चांदीचे भाव
दिनांक भाव झालेली घसरण१४ ऑक्टो. १,९५,००० ———१५ ऑक्टो. १,८५,००० १०,०००१६ ऑक्टो. १,७६,००० ९,०००१७ ऑक्टो. १,७८,००० २,०००+१८ ऑक्टो. १,७१,००० ७,०००२० ऑक्टो. १,७०,००० १,०००२१ ऑक्टो. १,६२,००० ८,०००
Web Summary : Silver prices crashed by ₹33,000 in seven days, including an ₹8,000 drop on Lakshmi Pujan. Silver reached ₹1,62,000. Meanwhile, gold prices increased by ₹600, reaching ₹1,29,000 per tola.
Web Summary : चांदी की कीमतों में सात दिनों में ₹33,000 की गिरावट आई, जिसमें लक्ष्मी पूजन पर ₹8,000 की गिरावट भी शामिल है। चांदी ₹1,62,000 पर पहुंच गई। वहीं, सोने की कीमतों में ₹600 की बढ़ोतरी हुई, जो ₹1,29,000 प्रति तोला पर पहुंच गई।