बोदवड बाजार समिती एकनाथ खडसेंकडे; तर धरणगाव गुलाबराव पाटलांकडे
By चुडामण.बोरसे | Updated: April 30, 2023 13:45 IST2023-04-30T13:45:29+5:302023-04-30T13:45:43+5:30
महाविकास आघाडीने सहा जागा जिंकल्या आहेत.

बोदवड बाजार समिती एकनाथ खडसेंकडे; तर धरणगाव गुलाबराव पाटलांकडे
जळगाव : बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८पैकी १६ जागांवर आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने विजय मिळवला आहे.
दुसरीकडे धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री गुलाबराव पाटील व भाजपा प्रणित आणि राष्ट्रवादीचा एक गट यांच्या पॅनेलने १२ जागा जिंकल्या आहेत, तर महाविकास आघाडीने सहा जागा जिंकल्या आहेत.