विवाहितेचा हात धरणारा ‘कादरखान’ खलनायकच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 19:20 IST2023-03-18T19:19:42+5:302023-03-18T19:20:28+5:30
शहरातील विवाहिता शनिवारी सकाळी मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होत्या.

विवाहितेचा हात धरणारा ‘कादरखान’ खलनायकच!
कुंदन पाटील
जळगाव -हात पकडून माझ्याकडे खूप पैसे असून माझ्यासोबत चल म्हणत मुलाला शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या कादरखान फकिरा खान याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील विवाहिता शनिवारी सकाळी मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होत्या. तेव्हा कादर खान याने विवाहितेचा रस्ता अडविला. विवाहितेचा हात पकडून माझ्याकडे खूप पैसे असून माझ्यासोबत चल असे म्हणत त्याने विनयभंग केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पीडिता प्रचंड घाबरल्या. त्यांनी तत्काळ घराकडे धाव घेतली.याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन कादर खान फकीरा खान याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार ओमप्रकाश सोनी हे करीत आहे.
कादरखान ‘खलनायक’च!
कादर खान याने यापूर्वीही पीडितेशी संपर्क साधण्यासाठी बहाणा केला होता. पीडितेच्या भावाचा मोबाईल क्रमांक हवा, या बहाण्याने तो तिच्या घरीही धडकला होता. मात्र विवाहितेने मज्जाव केल्यावरही तो ऐकत नव्हता. शेवटी त्याने शनिवारी सकाळी विवाहितेला हेरुन तिच्याशी अश्लील वर्तन केले. याप्रकाराने पिडितेच्या रहिवास भागात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.