शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

CHB वरील प्राध्यापकांच्या मानधनातील वाढ तुटपंजी, प्रत्यक्षातील समस्याही वेगळ्याच

By अमित महाबळ | Updated: April 2, 2023 19:41 IST

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी, तास व तासिका यातील घोळ मिटवावा आदी मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होत्या.

अमित महाबळ

जळगाव : आधीच तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या तासिका तत्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा गेल्या महिन्याच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानंतर वाढीव मानधनाचा आदेश निघाला पण दररोज भडकणाऱ्या महागाईच्या तुलनेत मानधनातील वाढ तुटपुंजीच ठरत आहे. त्यामुळे एवढ्या कमी पैशात घर भागवून दाखवाच साहेब.. अशी विचारणा आता सीएचबीवर काम करणारे प्राध्यापक करत आहेत.

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी, तास व तासिका यातील घोळ मिटवावा आदी मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होत्या. त्याआधारे शासनाने तासिका ६० मिनिटांची करण्यास मंजुरी दिली. तसेच मानधनात देखील वाढ केली आहे. मात्र, मानधन दर महिन्याला मिळायला हवे. कायम सेवेतील आणि सीएचबी प्राध्यापक यांना समान काम, समान फायदे व समान वेतन मिळावे, अशीही मागणी केली जात आहे.

तफावत दूर करा...

कागदावर असलेले व प्रत्यक्षात मिळणारे मानधन यामध्ये तफावत असते. अगदी कमी ठिकाणी मंजूर दरानुसार १०० टक्के मानधन मिळते, अशी माहिती काही प्राध्यापकांनी दिली.

कोणत्या अध्यापकांच्या माधनात किती वाढ?

अध्यापक - आधीचे - आताचेकला, वाणिज्य, विज्ञान (पदवी) - ६२५-९००कला, वाणिज्य, विज्ञान (पदव्युत्तर) - ७५०-१०००प्रात्यक्षिके (पदवी) - २५० - ३५०प्रात्यक्षिके (पदव्युत्तर) - ३०० - ४५०विधी (पदवी/पदव्युत्तर) - ७५० - १०००

तासिका घेतल्या तरच मानधन...

सीएचबीवरील प्राध्यापकांना तासिका घेतल्या तरच मानधन मिळते. मानधनाच्या बिलासोबत सहायक संचालक (उच्च शिक्षण) हे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक मागवून घेतात. परीक्षा कालावधीत तासिका होत नाहीत हे गृहित धरून त्या दिवसातील तासिकांचे मानधन वजा केले जाऊन उर्वरित मानधन काढले जाते. सुट्या, परीक्षा व इतर कारणांमुळे खूपच कमी प्राध्यापकांच्या महिन्याला ३६ तासिका होतात. दरमहा १२,४०० ते ३२,६०० दरम्यान त्यांना मानधन मिळते.

या नियोजनात तासिका केव्हा घ्यायच्या?वर्षाचे एकूण दिवस : ३६५ दिवसउन्हाळी सुट्ट्या : ४५ दिवसहिवाळी सुट्ट्या : २१ दिवसएकूण रविवार : ५२ दिवसराष्ट्रीय सण व उत्सव सुट्ट्या : २५प्रवेश प्रक्रिया : ३० दिवसमहाविद्यालय/विद्यापीठीय स्पर्धा/कार्यक्रम (सर्व) : ३० दिवसवरील वेळापत्रकानुसार एकूण २०३ दिवस सुट्ट्यांचे जातात. उरलेल्या १६२ दिवसात तासिका व परीक्षा होतात. निवड प्रक्रिया शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात झाली तर संपूर्ण वर्षात १६२ दिवस (५ महिने १२ दिवस) सीएचबीधारकांना मानधन मिळू शकतात; जेवढा विलंब तेवढे दिवस कमी होतात. यामुळे सीएचबीधारकांना शासन निर्णयानुसार ९ महिने जरी नियुक्ती मिळत असली तरी ५ ते ६ महिनेच मानधन मिळते. उरलेले महिने विना वेतन/मानधन काम करावेच लागते, असेही प्रा. नितीन घोपे यांनी सांगितले.

दरमहा मानधन मिळायला हवे...

शासनाने तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ केली पण लेखी आणि प्रात्यक्षिके यामध्ये असलेली तफावत दूर करावी. नियमित प्राध्यापकांप्रमाणे तासिका तत्वावरील प्राध्यापकांना दरमहा मानधन मिळावे.प्रा. नितीन घोपे, राज्य समन्वयक, शिक्षण क्रांती

टॅग्स :JalgaonजळगावTeacherशिक्षक