वाहनाने उडविल्याने दुचाकीवरील मुलाचा हात मोडला, आईचा पाय

By विजय.सैतवाल | Updated: September 18, 2023 16:16 IST2023-09-18T16:15:13+5:302023-09-18T16:16:14+5:30

रविवार, १७ सप्टेंबर रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

The child on the bike broke his arm, the mother's leg after being hit by the vehicle | वाहनाने उडविल्याने दुचाकीवरील मुलाचा हात मोडला, आईचा पाय

वाहनाने उडविल्याने दुचाकीवरील मुलाचा हात मोडला, आईचा पाय

जळगाव : जळगाव-भुसावळ मार्गावर मन्यारखेडा फाट्याजवळ वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार हैदर अली कासीम सय्यद (२५, रा. भुसावळ) याच्यासह त्याची आई गंभीर जखमी झाली. हा अपघात ११ सप्टेंबर रोजी झाला. याप्रकरणी रविवार, १७ सप्टेंबर रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
भुसावळ शहरातील अयान कॉलनीतील रहिवासी हैदर अली कासीम सय्यद हा ११ सप्टेंबर रोजी दुचाकीने (क्र. एमएच १९, डीसी ६६२२) आईला सोबत घेऊन जळगावला आला होता.

काम आटोपून दोघे मायलेक पुन्हा भुसावळकडे जात असताना वाहनाने (क्र. एमएच १९, सीएन ४२१६) दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की यात हैदर अली व त्याची आई दोघेही दुचाकीवरून फेकले गेले. यात हैदर अलीच्या हाताचे हाड मोडले गेले तर त्याच्या आईच्या पायाला, कमरेला गंभीर दुखापत झाली. यात दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातप्रकरणी हैदर अलीने रविवार, १७ सप्टेंबर रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून धडक देणाऱ्या वाहनावरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहेत.

Web Title: The child on the bike broke his arm, the mother's leg after being hit by the vehicle

टॅग्स :Accidentअपघात