मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या पाळधीत शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे अनावरण
By विजय.सैतवाल | Updated: September 19, 2022 17:40 IST2022-09-19T17:37:55+5:302022-09-19T17:40:40+5:30
मुक्ताईनगरात शिवसेनेची जाहीर सभा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या पाळधीत शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे अनावरण
लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी (२० सप्टेंबर) जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत पाळधी ता. धरणगाव येथे शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे अनावरण होणार आहे. तसेच मुक्ताईनगर येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे.
मंगळवारी दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री शिंदे यांचे जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. तेथून ते वाहनाने पाळधी, ता. धरणगाव येथे जाणार असून दुपारी ४ वाजता शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे अनावरण होणार आहे. त्यांनतर वाहनाने ते मुक्ताईनगरकडे जाणार आहेत. संध्याकाळी ५.३० वाजता मुक्ताईनगरात मुख्यमंंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर ते जळगाव विमानतळावर येऊन तेथून मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांचे जळगाव, भुसावळ व वाटेमध्ये अन्य ठिकाणी स्वागत केले जाणार आहे.