शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा संताप! मंत्री गुलाबराव पाटील आणि अनिल पाटलांचा ताफा रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 15:09 IST

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मारवड गावात शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा ताफा रोखल्याची घटना घडली होती.

प्रशांत भदाणे

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा ताफा संतप्त शेतकऱ्यांनी रोखला. ही घटना रविवारी सकाळी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मारवड गावात घडली.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मारवड गावात शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा ताफा रोखल्याची घटना घडली होती. दोन्ही मंत्र्यांना संतप्त शेतकऱ्यांनी पीक विम्याची भरपाई आणि अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर करावा, या मागणी संदर्भात कडक शब्दात जाब विचारला. यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याने मंत्री गुलाबराव पाटील आणि अनिल पाटलांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. शेतीचे प्रश्न आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारे शिवाजी पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांनी मंत्र्यांचा ताफा रोखला होता. शेतकरी आक्रमक होऊन प्रश्न विचारत असल्याने दोन्ही मंत्र्यांची अडचण झाली होती. दरम्यान, यावेळी मंत्री गुलाबराव पाटील आणि अनिल पाटलांनी अरेरावी केल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केलाय. घटनास्थळी तणाव निर्माण झाल्यानेपोलिसांनी संतप्त शेतकऱ्यांना बाजूला केलं, तेव्हा दोन्ही मंत्र्यांचा ताफा पुढे मार्गस्थ झाला. या घटनेचं गावातील काही लोकांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ शूटिंग केलं.

कार्यक्रमाला जात असताना घडली घटना 

मंत्री गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील हे अमळनेर तालुक्यातील कपिलेश्वर येथे आयोजित भक्त निवास आणि इतर विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी जात होते. तेव्हा मारवड गावात ही घटना घडली.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकGulabrao Patilगुलाबराव पाटील