नांदेड-घुरखेडा शिवारात हिंस्त्र प्राण्यांची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST2021-09-23T04:18:09+5:302021-09-23T04:18:09+5:30
नांदेड, ता. धरणगाव : नांदेडसह घुरखेडा शिवारात हिंस्रर प्राण्यांची दहशत कायम असून, दि. २१ ...

नांदेड-घुरखेडा शिवारात हिंस्त्र प्राण्यांची दहशत
नांदेड, ता. धरणगाव : नांदेडसह घुरखेडा शिवारात हिंस्रर प्राण्यांची दहशत कायम असून, दि. २१ च्या रात्री शेती शिवारात बांधलेल्या गायीच्या चार वर्षे वयाच्या वासरावर हल्ला करून फडशा पाडला. या आधी देखील दि. १८ च्या रात्रीसुद्धा देवीदास कोळी, तर त्या आधी जनार्दन गोसावी यांच्या चार वर्षे वयोच्या गायीच्या वासरांना लक्ष्य करीत त्यांच्यावर हल्ला चढवून फडशा पाडला होता. आता पुन्हा दि. २१ च्या रात्री येथील ज्ञानेश्वर गयभू कोळी यांच्या गायीच्या वासरावर हल्ला करून फडशा पाडला. या आधी घटनास्थळावर मिळून आलेल्या पावलांच्या ठशांवरून ते ठसे बिबट्याचेच असल्याचा अंदाज व्यक्त केला होता; परंतु वन विभागाकडून त्या हिंस्रर प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी अद्यापही काही उपाययोजना केली गेली नाही. सध्या हिंस्र प्राणी गुरांना आपले लक्ष्य करीत असून, शेती शिवारात एकट्यादुकट्या माणसावरदेखील हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
220921\img-20210922-wa0017.jpg
नांदेड -घुरखेडा शिवारात हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात ठार झालेले गायीचे वासरू