विहिरीत उडी घेऊन दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 15:03 IST2019-09-11T15:03:47+5:302019-09-11T15:03:55+5:30
वावडे, ता.अमळनेर : लोण बुद्रूक येथील मयूर रवींद्र पाटील (वानखेडे) याने गावालगत असलेल्या भाऊराव महादू बाविस्कर यांच्या शेतातील ...

विहिरीत उडी घेऊन दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
वावडे, ता.अमळनेर : लोण बुद्रूक येथील मयूर रवींद्र पाटील (वानखेडे) याने गावालगत असलेल्या भाऊराव महादू बाविस्कर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तो इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता. तो रवींद्र वसंत पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील सामान्य शेतकरीआहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण व आजी असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.