शिरसोलीत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 13:30 IST2020-03-14T13:30:23+5:302020-03-14T13:30:47+5:30
जळगाव : शिरसोली प्र.न. येथे गायत्री तुकाराम अस्वार (१६) या इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शुक्रवारी दुपारी १२ वाजता राहत्या ...

शिरसोलीत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
जळगाव : शिरसोली प्र.न. येथे गायत्री तुकाराम अस्वार (१६) या इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शुक्रवारी दुपारी १२ वाजता राहत्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गायत्री ही शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी होती. गुरुवारी दहावीचा गणिताचा पेपर कठीण गेल्यामुळे गायत्री तणावात होती. या तणावामुळे तिने गळफास घेतला असावा, अशी चर्चा आहे.
वडील तुकाराम व आई मंगलाबाई अस्वार शेतात कामावर गेले असताना ही घटना घडली. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती देऊन गायत्रीला जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे वैद्यकिय अधिकारी डॉ.संदीप पाटील यांनी तिला मृत घोषीत केले. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहिण असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयात तसेच अंत्यसंस्कारप्रसंगी आपसात वाद उद्भवला होता.