दहावी सीबीएसई निकाल : पोदार स्कूलचा घन:श्याम गोहिल शहरात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 23:37 IST2020-07-15T23:36:40+5:302020-07-15T23:37:13+5:30

जळगाव : केंद्र्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी सीबीएसई परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. यात पोदार ...

Tenth CBSE Result: Podar School Cube: Shyam Gohil tops the list | दहावी सीबीएसई निकाल : पोदार स्कूलचा घन:श्याम गोहिल शहरात अव्वल

दहावी सीबीएसई निकाल : पोदार स्कूलचा घन:श्याम गोहिल शहरात अव्वल

जळगाव : केंद्र्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी सीबीएसई परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. यात पोदार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी घन:श्याम सोमनाथ गोहिल याने ९८.४ टक्के गुण मिळवत अव्वल स्थान मिळविले. तसेच काशीनाथ पलोड पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी वंशिका राहुल पाटील हिने ९८.२ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. दरम्यान, नेहमीप्रमाणे तांत्रिक अडचणीमुळे काहींना निकाल उशिरा मिळाला़
सीबीएसई दहावीचा निकाल दुपारी १ वाजता संकेतस्थळावर जाहीर होताच अनेकांनी मोबाईल, लॅपटॉपचा आधार घेत निकाल पाहिला. यावेळी विद्यार्थ्यांनी घरातच पालकांसमवेत आनंद व्यक्त केला. एकत्र येण्यास बंदी असल्याने विद्यार्थ्यांनी आॅनलाइन मिटिंग करीत जल्लोष केला व प्रत्येकाचे गुण उत्सुकतेने जाणून घेताना विद्यार्थी दिसून आले़ शहरातून बाजी मारणाऱ्या घन:श्याम गोहिल याला आई-वडिलांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केला़ निकाल लागणार असल्यामुळे सकाळपासूनच विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता होती़

Web Title: Tenth CBSE Result: Podar School Cube: Shyam Gohil tops the list

टॅग्स :Jalgaonजळगाव