शिवरायांचा पुतळा हलविण्यावरून तणाव, दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 11:00 PM2021-01-19T23:00:56+5:302021-01-19T23:01:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने शिवाजी महाराजांचा पुतळा मुख्य चौकात बसवला. ...

Tension over moving the statue of Shivaraya, stone throwing | शिवरायांचा पुतळा हलविण्यावरून तणाव, दगडफेक

शिवरायांचा पुतळा हलविण्यावरून तणाव, दगडफेक

Next
ठळक मुद्देनिमखेडी खुर्द येथील घटना : नऊ जणांना अटक, तीन पोलीस जखमी
कमत न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने शिवाजी महाराजांचा पुतळा मुख्य चौकात बसवला. या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस ताफ्याने ग्रामस्थांची समजूत घालत असताना अचानक ग्रामस्थांकडून झालेल्या दगडफेकीत सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, निमखेडी खुर्द गावातील मुख्य चौकात ओट्यावर चबुतरा बांधून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. सकाळी या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, सपोनि नीलेश सोळुंके, कैलास भारास्के, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार प्रमोद झांबरे यांच्यासह अधिकारी वर्ग सकाळी नऊला गावात पोहोचले. त्यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांची समजूत घातली. तरीही ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी राहील, अशी आग्रही मागणी गावातील तरुण, पुरुष, महिला यांनी लावून धरली. एवढेच नव्हे तर पुतळा हटवल्यास आम्ही आमच्या जीवाचे बरे वाईट करून घेऊ, अशा धमक्यासुद्धा काही ग्रामस्थांनी याप्रसंगी प्रशासनाला दिल्या. समजूत घालत असतानाच अचानक दगडफेक तहसीलदार श्वेता संचेती ग्रामस्थांची समजूत घालत असतानाच अचानक दगडफेकीला सुरुवात झाली. या दगडफेकीत उपविभागlय पोलीस कार्यालयाचे कर्मचारी विजय कचरे, वरणगावचे सपोनि संदीपकुमार बोरसे तसेच आरसीपी प्लाटूनचे पोलीस कर्मचारी मोहसीन शेख यांना दगड लागल्याने ते जखमी झाले. मोसीन शेख यांच्या छातीवर वीट लागली, तर विजय कचरे यांच्या हाताला १० टाके पडले. बंदोबस्तासाठी दोन आरसीबी स्त्रायकिंग फोर्स, मुक्ताईनगर बोदवड येथील तसेच वरणगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यांचा जवळपास १०० जणांचा ताफा गावात आहे. या दरम्यान पोलिसांनी पुतळा हटवला. दोषींवर कारवाई करणार दरम्यान, मंगळवारी दुपारी दोनला पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे व प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी गावात भेट दिली. याप्रसंगी मुंडे यांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. पळापळीनंतर वृद्धाचा घरी मृत्यू गावातील या घटनेत पोलिसांवर दगडफेक सुरू झाल्यानंतर पळापळ सुरू झाली. यात गावातील ८५ वर्षीय वृृृद्ध रघुनाथ मोतीराम डहाके यांचा घरी मृत्यू झाला. आजच्या घटनेचा येथे काही संबंध नसल्याचे पो.नि. शिंदे यांनी सांगितले. अजून ९० ते १०० जणांवर कारवाई होणार निमखेडी खुर्द येथे बेकायदा पुतळा बसवल्या प्रकरणी हवालदार संजीव पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरुन संशयित म्हणूृन दीपक बाबूलाल डहाके, गजानन दिनकर घोगरे, अतुल विलास डहाके, मंगेश रामकृृष्ण मराठे , सतीश सुधाकर डहाके, देवेंद्र रमेश डहाके, कैलास विठ्ठल डहाके, अरविंद भीमराव लोमटे, मंगल फरदडे यांच्यासह तीन अल्पवयीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन वगळता नऊ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमदर्शनी १२ संशयित आरोपी करण्यात आले आहेत. अजून ९० ते १०० संशयितांवर कारवाई होणार असल्याचे पो.नि. सुरेश शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Tension over moving the statue of Shivaraya, stone throwing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.