Tell us about the Bhulabai ceremony at Chalisgaon | चाळीसगाव येथे भुलाबाई सोहळ्याची सांगता

चाळीसगाव येथे भुलाबाई सोहळ्याची सांगता

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी घेतला विविध उपक्रमात सहभागपालकांसाठीही संगीत खुर्ची स्पर्धा

चाळीसगाव, जि.जळगाव : शहरातील सम्राट अशोक बालक मंदिरात सुरू असलेल्या भुलाबाई सोहळ्याची सांगता १२ रोजी उत्साहात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस.डी. महाजन होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा लताबाई अशोक खलाणे उपस्थित होत्या.
कार्यक्रमात बालवर्गाच्या विद्यार्थ्यांचा नृत्य, रॅम्पवॉक, वेशभूषा यांचा समावेश होता.
महिला पालक वर्गासाठी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. यात कविता राजेंद्र पवार (बिलाखेड) यांचा प्रथम क्रमांक आला. वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने आकर्षक भेट वस्तू देण्यात आली.
या कार्यक्रमास पालक उपस्थित होते. प्रास्ताविक बालवर्गाच्या प्रमुख एल.एम.वाघ यांनी केले. सूत्रसंचालन व्ही.एस.बोरसे यांनी केले.

Web Title: Tell us about the Bhulabai ceremony at Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.