वाक शिवारात ‘तेजापूर’ मिरचीचे तेज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 04:49 PM2019-07-27T16:49:46+5:302019-07-27T16:50:14+5:30

नाव शेख, अन् मिरची देख । ऐन उन्हाळा आणि दुष्काळावर मात करीत फुलवला मळा

'Tejapur' chilli flakes in Wak Shivar ... | वाक शिवारात ‘तेजापूर’ मिरचीचे तेज...

वाक शिवारात ‘तेजापूर’ मिरचीचे तेज...

Next


संजय हिरे।
खेडगाव, ता.भडगाव : ऐन उन्हाळ्यात ४५ डिग्री सेल्सिअसवर तापमान, शिवाय सोबतीला दुष्काळामुळे विहिरीला जेमतेम पाणी असतांना गिरणाकाठालगतच्या केळी, ऊसपट्टा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या वाक शिवारात शेख जाफर शेख बिस्मिल्ला या शेतकºयाने दीड एकरावर तेजापुरी जातीच्या मीरचीचे पीक घेत शेतक-यांचे लक्ष वेधुन घेतले आहे.ऐन उन्हाळ्यात तीचे तेज (हिरवीगार) पाहुन तालुक्यात आश्चर्य व्यक्त होत आहे. नाही त्या चढाओढीने बढाया इतर शेतकऱ्यांकडुन मारल्या गेल्यात म्हणुन या शेतावर भेट देत लोकमतने जाणुन घेतलेल्या खाण्यास तेज (तीखट) अशा तेजापुरी मिरचीच्या तेजाचे रहस्य जाणून घेतले.
प्रतीकुल हवामानामुळे यंदा मीरची लागवड नाहीच. तालुक्यात पळासखेडे,गुढे व इतर तालुक्यात देखील कुठेतरी एखाद्या दोन ठिकाणीच तीची लागवड दिसते. बाजारात येते ती मिरची नाशीक व तापीकाठालगतच्या काही गावातुन.
आता तीव्र तापमानामुळे पाँलीहाऊस व ग्रीन हाऊसमधे मिरची लागवड केली जाते. अशी कोणतीही उपलब्धता नसतांना वा भाजीपाला लागवाडीचा कोणताही अनुभव गाठीस नसतांना या अल्पभुधारक शेतकºयाने केलेले धाडस म्हणुनच उल्लेखनीय आहे.
शेख यांनी जवळच्या नातेवाईकाच्या सल्ल्याने घाटनांद्रा ता. कन्नड येथील नर्सरीतुन २७ एप्रील रोजी तेजापुर मीरचीचे रोप आणले. ऐन उन्हाळ्यात आणलेले रोप संध्याकाळी माना टाकु लागले. तेव्हा इतर शेतकºयांनी त्यांना वेड्यात काढले. त्याच स्थीतीत सरी-वरंबा पध्दतीने ठिबकवर ती दुसºया दिवशी लावलीत. रोप, लावणी १५ हजार खर्च आला. बुरशीनाशक, किटकनाशक फवारणी व ठिबकमधुन लिक्विड (द्रवरुप खते, सुक्ष्मखते,आदी रसायने) सोडत योग्य निगा राखली. याचा ४५-५० हजार एकुण खर्च आला. मे मधे मीरचीचे हिरवेगार क्षेत्र पाहुन शेतकरी थांबु लागले. तेजापुर मिरचीला वाशी,गुजरात असे मार्केट आहे. हॉटेलमधे वडा-पाव बरोबर व भैय्या लोकांची ती आवडीची आहे. निसर्गाने साथ दिल्यास यापुढे चांगला तोडा निघण्याची आशा शेतकºयाला आहे. उत्पन्नाच्या बाबतीत 'पहलेच बढा-चढाके कहेनेमे क्या ठीक नही,...!अशी भावना जाफर शेख यांची आहे. मुले भडगावी सेंट्रीग काम करतात.तेथुन येत पती-पत्नी दोघेच शेतात राबतात. तरी देखील या वयात काळ्या आईची सेवा करण्यात त्यांना जो आनंद मिळतो त्याची चमक त्यांच्या चेहºयाबरोबर प्रत्यक्ष शेतातही दिसते हे मात्र नक्की.
यांची रोप लावणी, त्यांची मिरची काढणी
यावर्षी खान्देशात दुष्काळामुळे उन्हाळी मिरचीचे क्षेत्र नगण्य आहे. विहिरींना पाणीच नसल्याने खरिपात देखील मिरची रोप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. पाऊस झाल्यानंतर आता कुठे रोपाला मागणी वाढली. आहे ते रोप आता लावणीला घेतले आहे. जवळजवळ एक-दिड महिना उशीर झाला आहे. यामुळे इतर भाजीपाल्याचे भाव खाली आले तरी हिरव्या मिरचीचे दर स्थिर आहेत. अजुन एक महिना किंवा खरिपातील मिरची काढणीला येईस्तोवर भाव टिकुन राहतील, अशी शेतकºयाला आशा आहे. यामुळे शेख यांच्यासह मिरची काढणीला आलेल्या इतर शेतकºयांना याचा लाभ मिळु शकतो.
मिरची तोडण्यास घाटावरील मजूर मागवणार
यावर्षी पावसाळा उशीरा सुरु झाल्याने मीरची निघण्यास देखील एक महीना विलंब झाला. मागील आठवड्यात पहीला तोडा ११ हजाराचा निघाला. दोन क्विंटलचा. सध्या भाव पन्नास रुपये किलो मिळतोय. ही मीरची तोडण्यास लागणारे कुशल महिला मजुर आपल्याकडे नाही यामुळे घाटावरुन मजुर मागवणार असल्याचे शेतकरी सांगतो. सध्या विविध कृषी कंपन्यांचे प्रतिनिधी येतात फोटोसेशन करीत भंडावुन सोडत आहेत. लाभ मात्र त्यांच्यापासुन कोणताच नाही.

Web Title: 'Tejapur' chilli flakes in Wak Shivar ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.