शिक्षकांनी प्रयत्नशीलच असावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 23:36 IST2018-08-27T23:35:40+5:302018-08-27T23:36:06+5:30

कार्यशाळा : गटशिक्षणाधिकारी सचिन परादेशी यांचे उद्बोधन

The teachers should try hard | शिक्षकांनी प्रयत्नशीलच असावे

शिक्षकांनी प्रयत्नशीलच असावे

चाळीसगाव, जि.जळगाव : जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. समस्या निर्माण झाल्यानंतर त्यावर प्रयत्नपूर्वक मार्ग काढून मात करता येते. ही गोष्ट शिक्षकांनी घेतली पाहिजे. प्रयत्नशील शिक्षक चांगले परिवर्तन घडवू शकतात, असे मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांनी येथे केले.
सोमवारी सकाळी ११ वाजता येथील एच.एच.पटेल प्राथमिक विद्यालयात खासगी प्राथमिक व न.पा.शाळांच्या शिक्षक परिषद कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी दिलीप माळी होते.
व्यासपीठावर यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी विलास भोई यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापिका विजया सोमवंशी यांनी केले. कृतीयुक्त परिपाठ शिक्षक सुनील पाटील यांनी घेतला. नमुना पाठाचे सादरीकरण शिक्षक अभिजित राखुंडे यांनी केले. पुस्तक परिचय योगेंद्र राजपुत यांनी करुरून दिला. सूत्रसंचालन स्मिता हळकुंडे यांनी केले.

Web Title: The teachers should try hard