साकरे विद्यालयात शिक्षक दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST2021-09-06T04:19:43+5:302021-09-06T04:19:43+5:30

धरणगाव : तालुक्यातील साकरे येथील बा. च. भाटिया माध्यमिक विद्यालयात कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून शिक्षक दिवस उत्साहात साजरा ...

Teacher's Day at Sakare Vidyalaya | साकरे विद्यालयात शिक्षक दिवस

साकरे विद्यालयात शिक्षक दिवस

धरणगाव : तालुक्यातील साकरे येथील बा. च. भाटिया माध्यमिक विद्यालयात कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून शिक्षक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या वर्गांवर विद्यार्थी शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य केले. अध्यक्षस्थानी अनिल पाटील होते. मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी कोरोना काळातील शिक्षकांनी केलेले प्रयत्न याविषयी सांगितले.

विद्यार्थी शिक्षकांमधून पूर्वशी योगेश पाटील व उर्मिला नितीन बाविस्कर या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी निमझरी गावातील निवृत्त सैनिक विजय प्रकाश पाटील यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना पेनांचे वाटप करण्यात आले. फर्जाना खाटीक व योगिता पाटील या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले. स्वाती पाटील या विद्यार्थिनीने सर्वांचे आभार मानले.

050921\153-img-20210905-wa0032.jpg

फोटो कॅप्शन: साकरे शाळेचा मुख्याध्यापिका अनिता अनिता पाटील सोबत शिक्षक वृंद.

Web Title: Teacher's Day at Sakare Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.