चाळीसगावात धावत्या रेल्वेतून पडल्याने शिक्षिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 19:34 IST2018-07-12T19:32:46+5:302018-07-12T19:34:57+5:30

Teacher dies due to running train in Chalisgaon | चाळीसगावात धावत्या रेल्वेतून पडल्याने शिक्षिकेचा मृत्यू

चाळीसगावात धावत्या रेल्वेतून पडल्याने शिक्षिकेचा मृत्यू

ठळक मुद्देरेल्वेत चढत असताना पाय घसरल्याने झाला अपघातचाळीसगाव रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक १ वरील घटनाभुसावळ शटल बंद असल्याने प्रवाशांची गर्दी

चाळीसगाव: रेल्वेत चढत असतांना पाय घसरुन पडल्याने चाळीसगावच्या शिक्षिकेचा गुरुवारी सकाळी पावणेआठ वाजता जागीच मृत्यू झाला. ही घटना फलाट क्र. एक वर खंबा क्र. ३२७/१० ते ११ व खंबा क्र. ३२७/१०ते १५ दरम्यान घडली.
मालेगाव रस्त्यावरील राखुंडे नगरात राहणा-या आणि टाकळी प्र.दे.येथील अश्वमेध पब्लिक स्कूलच्या शिक्षिका प्रतिभा रवींद्र्र पाटील (वय ३२) या जळगाव येथे प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र एक्सप्रेसने जात होत्या. देवळाली - भुसावळ शटल गेल्या दहा दिवसांपासून बंद असल्याने सकाळी जळगावकडे जाणा-या प्रवाश्यांना महाराष्ट्र एक्सप्रेसशिवाय पर्याय नाही. यामुळे प्रवाश्यांची तोबा गर्दी होते.
गुरुवारी शिक्षिका पाटील महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये चढत असतांना गर्दीत त्यांचा पाय घसरल्याने त्या थेट रेल्वेखाली आल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रतिभा पाटील यांच्या पश्चात पती, सासू, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Teacher dies due to running train in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.