बोदवड येथे तालुका युवक कॉग्रेसची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 15:10 IST2018-12-23T15:07:24+5:302018-12-23T15:10:04+5:30
बोदवड तालुका युवक काँग्रेसची मासिक बैठक २१ रोजी येथे शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली.

बोदवड येथे तालुका युवक कॉग्रेसची बैठक
बोदवड, जि.जळगाव : बोदवड तालुका युवक काँग्रेसची मासिक बैठक २१ रोजी येथे शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. युवक काँग्रेसची ‘गाव तेथे शाखा’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश सुभाष पाटील होते. या सभेमध्ये युवक काँग्रेसमधील तालुकास्तरीय व शहरस्तरीय पदे देण्यासंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांशी चर्चा केली.
युवक काँग्रेसची गाव तेथे शाखा हा उपक्रम तालुक्यात राबवण्यासाठी प्रा.हितेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. येत्या दोन महिन्यात तालुक्यातील प्रत्येक गावात शाखा उघडण्याचा ठराव घेतला.
या बैठकीस प्रमोद माळी, रामधन माळी, किरण भिसे, सचिन पाटील, पिंटू पाटील, नाना पाटील, सुधाकर वाघ, अजय पाटील, वीरेद्र चिम, गणेश भगत, अमर पवार, महेंद्र होडगरे तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.