भडगावात ४४ शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST2021-09-09T04:21:27+5:302021-09-09T04:21:27+5:30

सभापती डाॅ. अर्चना पाटील यांच्या संकल्पनेतून त्यांनी व शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांच्यासह संपूर्ण टीम, विविध ...

Taluka level ideal teacher award to 44 teachers in Bhadgaon | भडगावात ४४ शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

भडगावात ४४ शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

सभापती डाॅ. अर्चना पाटील यांच्या संकल्पनेतून त्यांनी व शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांच्यासह संपूर्ण टीम, विविध शिक्षक संघटना यांच्या सहकार्याने या तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळा सभापती डाॅ. अर्चना पाटील यांनी नियोजनातून आयोजित केला होता. भडगाव तालुक्यात हा प्रथमच पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला.

अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील होते. यावेळी सभापती डाॅ. अर्चना पाटील, जिल्हा परिषद सदस्य स्नेहल गायकवाड, डाॅ. विशाल पाटील, पंचायत समिती सदस्य रामकृष्ण पाटील, गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, शिक्षण विस्तार अधिकारी गणेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सदस्य युवराज पाटील, माउली फाउंडेशनचे युवराज पाटील, विस्तार अधिकारी टी. पी. मोरे, अधीक्षक दिलीप चिंचोरे उपस्थित होते.

आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आशादेवी महाले, मनीषा पाटील व योगेश शिंपी यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख संजय नाहिंदे, एम. आय. खान, अशोक खेडकर, प्रवीण सुतार यांच्यासह गटसाधन केंद्राचे निंबा परदेशी, किशोर पुजारी, सुभाष माळी, मनोहर माळी, प्रतिभा पाटील, छाया देसले, सविता चौधरी, प्रतिभा महाजन, किशोर पाटील व जितेंद्र माने यांनी परिश्रम घेतले.

सूत्रसंचलन सुभाष उगले यांनी, तर आभार प्रवीण सुतार यांनी मानले.

Web Title: Taluka level ideal teacher award to 44 teachers in Bhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.