शिरूड येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:04 IST2019-08-28T23:04:09+5:302019-08-28T23:04:13+5:30

अमळनेर : तालुक्यातील शिरूड येथे आयोजित तालुकास्तरीय खो-खो स्पर्धामध्ये १४ वर्षे वयोगटात लोंढवे येथील एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयाच्या मुलांचा संघ ...

Taluk level sports competition at Shirod | शिरूड येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

शिरूड येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा




अमळनेर : तालुक्यातील शिरूड येथे आयोजित तालुकास्तरीय खो-खो स्पर्धामध्ये १४ वर्षे वयोगटात लोंढवे येथील एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयाच्या मुलांचा संघ अंतिम विजेता ठरला. या संघाने रणाईचे आश्रम शाळेच्या संघाचा पराभव केला.
व्हीझेड पाटील हायस्कूल येथे आयोजित स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या हस्ते झाले. तालुका क्रीडा समनव्यक सुनील वाघ यांनी प्रास्ताविक. गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन, मुख्याध्यापक जे.एम.पाटील, शालेय समिती अध्यक्ष जयवंतराव पाटील, आर.ए. शिंदे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी एम.ए.पाटील, प्रकाश पाटील, संजय पाटील, पी.डी.पाटील डी.ए.धनगर, शरद कुलकर्णी, वसंत पाटील, भालेराव पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जे.डी.अहिरे यांनी केले. आर.ए.शिंदे यांनी आभार मानले. पंच महेश माळी, सुनील वाघ, मिलिंद पाटील, व्ही.डी.पाटील, डी.टी.खैरनार यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Web Title: Taluk level sports competition at Shirod