दैनंदिन कामकाजातून वेळ काढत पोलिसांनी शारीरिक संपदा जोपासावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 16:39 IST2018-03-25T16:39:39+5:302018-03-25T16:39:58+5:30

चाळीसगाव येथे कार्यशाळेत अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांचे आवाहन

Taking time out from day-to-day work, police should have physical resources | दैनंदिन कामकाजातून वेळ काढत पोलिसांनी शारीरिक संपदा जोपासावी

दैनंदिन कामकाजातून वेळ काढत पोलिसांनी शारीरिक संपदा जोपासावी

ठळक मुद्देपोलिसांनी शारीरिक आणि मानसिक संतुलित कायम राहण्यासाठी प्रयत्न करावेत.दररोज थोडाफार व्यायाम करण्याची सवय लावल्याने आपल्या उणीवा दूर होतील.प्रसन्न राहिल्याने आणि आनंदी स्वभावामुळे सकारात्मक विचारांमध्ये वृद्धी होण्यास मदत होते.


आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि.जळगाव, दि. २५ : शहरातील बी.पी.आर्ट्स,एस.एम.ए सायन्स आणि के.के.सी कॉमर्स महाविद्यालयात मानसशास्त्र विभागाच्या वतीने ‘ताण-तणाव व्यवस्थापन व समुपदेशन’ यावर कार्यशाळा घेण्यात आली.पोलीस परिमंडळातील पोलीस बांधव उपस्थित होते. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, चाळीसगाव एजुकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रा.बाळासाहेब चव्हाण, प्रा.डॉ.मिलिंद बचुटे (शिरपूर) यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. दैनंदिन कामकाजातून वेळ काढून पोलिसांनी आरोग्य संपदा जपावी, असे आवाहन प्रशांत बच्छाव यांनी केले.
या वेळी संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, संचालक डॉ.सुनील राजपूत, कनकसिंग राजपूत, राजेंद्र चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील, शहर पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील, मेहुणबारे ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिरसाठ, वाहतूक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ तसेच प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपप्राचार्य प्रकाश बाविस्कर आणि मानसशास्त्र विभागप्रमुख ललिता उपाध्ये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून ताण-तणाव आणि समुपदेशन संदर्भातील पोलिसांचे आरोग्य, नियमित व्यायाम आणि शारीरिक स्वास्थ्याबाबत कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती दिली.
पोलीस बांधवांकडील जनतेच्या अपेक्षा उंचावलेल्या असतात. त्यात मोर्चा, आंदोलन, बंदोबस्त, सणवार नियोजन यात अनेकदा पोलिस बांधव ताण-तणावास सामोरे जात असतो. सुसंवाद आणि समन्वयाच्या अभावास बळी पडतो. पोलिसांनी आपल्या उणीवा दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील रहायला हवे. तसे पाहता कोणताही मनुष्य सर्वगुणसंपन्न असू शकत नाही. दिवसेंदिवस अधिकाधिक प्रसन्न राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रसन्न राहिल्याने आणि आनंदी स्वभावामुळे सकारात्मक विचारांमध्ये वृद्धी होण्यास मदत होते. शरीर सक्रिय ठेवण्यातच खरा फायदा आहे. सामर्थ्यानुुसार शरीराला कामे देणे गरजेचे आहे. पोलिसांचा प्रदूषणाशी कायम संबंध येतो. यातूनच श्वसनसंस्थेचे विकार, खोकला, दमा यांचा प्रामुख्याने समावेश होते. प्राणायाम केल्याने फुप्फुसाची क्षमता वाढते, योगासन आणि सूर्यनमस्कार नियमित केल्यास सर्वांगास फायदा होतो. याकरीता नियमित व्यायाम आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रशांत बच्छाव यांनी केले.
अनेक गोष्टींना पोलिसास सामोरे जावे लागते. शारीरिक नियंत्रण राखण्यासाठी विद्यार्थ्याने अभ्यासाशी, कामगाराने रोजगाराशी आणि पोलिसांनी शारीरिक कसरती आणि मानसिक स्थितीशी सजग राहायला हवे, असे प्रमुख वक्ते तथा मानसशास्त्र विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.मिलिंद बचुटे यांनी समुपदेशन केले.









 

Web Title: Taking time out from day-to-day work, police should have physical resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.