जळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामाकरिता हरभरा व गहू या पिकांसाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळातर्फे ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होणेकरिता इच्छुक शेतकऱ्यांनी राज्य शासनाने विकसित केलेल्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे, तसेच त्यासाठी अर्जदार महाडीबीटी फार्मर या मोबाइल ॲप्लिकेशनचा वापर करू शकतात.
मुद्रांक जिल्हाधिकारीपदी उमेश शिंदे
जळगाव : जिल्ह्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सहजिल्हा निबंधक म्हणून उमेश शिंदे यांनी पदभार स्वीकारला आहे. सहजिल्हा निबंधक व्ही.एस. भालेराव यांची अहमदनगरला मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. शिंदे यांनी या आधी बुलडाणा येथे काम केले आहे, तसेच पाचोरा येथे १९९८ मध्ये दुय्यम निबंधक म्हणूनदेखील काम पाहिले आहे.