शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

गोगडी धरणावरील कृषीपंप उचलण्यासाठी तहसीलदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 6:22 PM

दमदार पावसाची प्रतीक्षा : जलसाठे कोरडेठाक

पहूर, ता जामनेर, जि.जळगाव : आॅगस्ट महिना उजडला तरीही पहूरसह परिसरातील जलसाठे कोरडेठक आहेत. गोगडी धरणावरून कसबे व पेठ गावाचा सध्या पाणीपुरवठा सुरू आहे.पण या धरणात मृत साठ्यापेक्षाही अल्प प्रमाणात पाणी साठा शिल्लक आहे. हा साठा पेठ व कसबे ग्रामपंचायतीने गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केला आहे. पण या साठ्यावर कृषीपंप बसविले आहे. त्यामुळे काही दिवसांतच भीषण पाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी कसबे ग्रामपंचायतीने तहसीलदारांना निवेदन देऊन हे कृषीपंप उचलण्याचे साकडे घातले आहे.कसबे व पेठ गावाचा पाणीपुरवठा सध्या गोगडी धरणातून होत आहे. कसबे गावात बारा ते तेरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तर पेठ गावात पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन असून, दोन्ही गावांच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहेत. पेठ गावाला कायमस्वरूपी पिंपळगाव कमानी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र धरण आज कोरडे ठक आहे. त्यामुळे पेठ व कसबे गावात गोगडी धरणातून पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. जुलै महिन्यात झालेल्या पाऊसामुळे अल्पसे पाणी गोगडित आले होते. पण ते पाणी मृत साठयापेक्षाही कमी असून हा साठा आरक्षित करण्यात आलेला आहे. मात्र या साठ्यावर काही जणांनी कृषी पंप बसवून रात्रीच्या वेळेस शेतीला पाणी देण्यासाठी उपसाकरीत आहेत. हे तत्काळ थांबून हे कृषी पंप उचलण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन कसेबेच्या सरंपच ज्योती शंकर घोंगडे यांनी तहसिलदारांना सोमवारी दिले आहे.तसेच पेठ ग्रामपंचायतने अशा अशायाचे निवेदन दयावे अशी अपेक्षा हि कसबे ग्रामपंचायतीसह सामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडेपहूरसह परिसरात जुलै महिन्यात झालेल्या पाऊसाने पिकस्थिती चांगली आहे. पण अद्यापही दमदार पाऊस न झाल्यामुळे पिकांना आज पावसाची नितांत आवश्यकता भासत आहे. मक्याच्या पिकाच्या वाती होत असून, हातात आलेले उडीद, मुगाचे पिक पाण्याअभावी हातातून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्य कपाशी पिकाला वाचवण्यासाठी शेतकरी इकडून तिकडून पाण्याची व्यवस्था करीत आहे. पावसाअभावी शेतकरी वर्गही मेटाकुटीला आल्याचे दिसून येत आहे, तर पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.पेठ ग्रामपंचायतीच्यावतीने वाघूर नदीचे खोलीकरणकेल्यामुळे नदीपात्रात पाणी साठवण झाले आहे. त्यामुळे पेठ गावातील विहीर, कुपनलिका व बंद पडलेले हातपंप यांना पाणी आले आहे. तसेच वाघूर नदीतच कट्ट्याचे बांधकाम केल्याने त्याचा फायदाहीपेठ गावाला होत असल्यामुळे गावकºयांची तहान भागवत आहे.अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा असून पाणी प्रश्न गंभीर आहे. गोगडी धरणात मृत साठ्याम्रुतसाठ्यापेक्षाहि अल्प प्रमाणात पाणी आहे. हा साठा आरक्षित आहे. पण या साठ्यावर बसविण्यात आलेले कृषी पंप तत्काळ उचलण्यासाठी तहसिदारांना सोमवारी निवेदन दिले आहे. जेणेकरुन गावाला पाणीपुरवठा सुरळीत करता येईल.-ज्योती शंकर घोंगडे, सरपंच, कसबे, ता.जामनेर 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJamnerजामनेर