जळगावच्या जगदीश झोपेची सैयद मुश्ताक अली स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:16 IST2020-12-31T04:16:26+5:302020-12-31T04:16:26+5:30

जळगाव : जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू जगदीश झोपे याची बीसीसीआयच्या सैयद मुश्ताक अली टी२० स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य क्रिकेट ...

Syed Mushtaq Ali of Jagdish Zope of Jalgaon selected for the competition | जळगावच्या जगदीश झोपेची सैयद मुश्ताक अली स्पर्धेसाठी निवड

जळगावच्या जगदीश झोपेची सैयद मुश्ताक अली स्पर्धेसाठी निवड

जळगाव : जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू जगदीश झोपे याची बीसीसीआयच्या सैयद मुश्ताक अली टी२० स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली आहे.

रणजीपटू असलेल्या जगदीश झोपे याने याआधीही या स्पर्धेत राज्य संघाकडून शानदार खेळ केला आहे. २०१८च्या सत्रात तो सैयद मुश्ताक अली स्पर्धेत आपला अखेरचा सामना खेळला होता. त्याआधी त्याने २०१७ च्या सत्रात रणजी स्पर्धेतून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आता त्याची २० सदस्यांच्या संघात निवड करण्यात आली आहे. संघाचा कर्णधार म्हणून राहुल त्रिपाठी याची नियुक्ती करण्यात आली आहे. सैयद मुश्ताक अली स्पर्धेत महाराष्ट्राचा पहिला सामना गुजरातच्या विरोधात १० जानेवारीला होणार आहे. डावखुरा अष्टपैलू खेळाडू असलेल्या जगदीश याने एका प्रथम श्रेणी सामन्यासह सात लिस्ट ए सामने देखील खेळले आहेत.

Web Title: Syed Mushtaq Ali of Jagdish Zope of Jalgaon selected for the competition