जळगावात वृद्धाचा स्वाईन फ्लूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 15:45 IST2018-09-25T15:44:41+5:302018-09-25T15:45:46+5:30

जळगाव तालुक्यातील असोदा येथील शांताराम राजाराम चौधरी (वय ७०) यांचा रविवारी दुपारी दोन वाजता औरंगाबाद येथील घाटी या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

Swine flu deaths in Jalgaon | जळगावात वृद्धाचा स्वाईन फ्लूने मृत्यू

जळगावात वृद्धाचा स्वाईन फ्लूने मृत्यू

ठळक मुद्देऔरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात निधनअसोदा येथे झाले अंत्यसंस्कारपाच दिवसांपासून जाणवत होते लक्षणे

जळगाव : तालुक्यातील असोदा येथील शांताराम राजाराम चौधरी (वय ७०) यांचा रविवारी दुपारी दोन वाजता औरंगाबाद येथील घाटी या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. पाच दिवसांपासून त्यांना स्वाईन फ्लूचे लक्षण जाणवत होते. त्यामुळे प्रकृती खालावल्याने चौधरी यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. रविवारी दुपारी मृत्यू झाल्यानंतर रात्री असोदा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बळीरामपेठेतील हॉकर्स पिंटू चौधरी यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Swine flu deaths in Jalgaon