शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

जिल्हा परिषद शाळेतील मुलांना स्वेटर व बूट दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 19:19 IST

मुक्ताईनगर येथे पंचायत समितीतील कर्मचाऱ्याचा उपक्रम

मुक्ताईनगर, जि.जळगाव : एरवी व घरातील मृत व्यक्तीची वर्शी म्हटली की, वर्शीचा कार्यक्रम करणे, पूजापाठ करणे व जेवणावळी करणे या पलीकडे काहीही कार्य हे केले जात नाही. मात्र वडील हे सेवाभावी वृत्तीचे असल्याने त्यांच्याचप्रमाणे आपणही सेवाधर्म जागवावा या उद्देशाने प्रेरित होऊन मुक्ताईनगर पंचायत समितीतील कर्मचारी नितीन किसन पाटील यांनी आपल्या वडील किसन नामदेव पाटील यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेत बूट व स्वेटरचे वाटप करून एक आदर्श पायंडा समाजासमोर ठेवला आहे.किसन नामदेव पाटील यांचे गेल्या वर्षी निधन झाले. आज त्यांची वर्शी होती. वर्षीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम व धार्मिक विधी करणे या पलीकडे जाऊन आपण काही तरी आगळे वेगळे करावे असा उद्देश नितीन पाटील यांनी ठरवला व मुक्ताईनगर येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनमध्ये जाऊन गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी स्वेटर व त्याचे वाटप केले.याशिवाय मुक्ताईनगरातील जुन्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपये देणगीही नितीन पाटील यांनी दिली.याप्रसंगी किसन पाटील यांच्या पत्नी पुष्पाबाई पाटील व पूर्ण परिवार तसेच गटशिक्षणाधिकारी व्ही.डी. सरोदे, नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनीषा पाटील, नगरसेविका कुंदा पाटील तसेच शहरातील मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर