शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

मास्टर कॉलनीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 22:22 IST

शरीरावर मारहाणीचे व्रण : खुनाच्या अफवेने यंत्रणेची धावपळ

जळगाव : मास्टर कॉलनीत असलम हनीफ पटेल (वय २३) हा तरुण त्याच्या घरातच बुधवारी दुपारी १२ वाजता मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या अंगावर छातीवर, तसेच गळयावर मारहाणीचे व्रण असल्याने ही घटना संशयास्पद असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. ही घटना उघड होताच खुनाची अफवा पसरली. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी चौकशी केली असता, कुठलीही संशयास्पद अशी माहिती मिळून आलेली नाही, असे असले तरी शवविच्छेदन अहवालातच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

मास्टर कॉलनीत हनीम रज्जाक पटेल हे पत्नी मुन्नी, मुलगा असलम यांच्यासोबत वास्तव्यास होते. हनीफ पटेल हे मिस्तरी काम करतात. मुलगा असलम एमआयडीसीत मामाच्या कंपनीत कामाला होता.बुधवारी वडील हनीफ कामावर गेले होते. सकाळी १० वाजाता आईसोबत असलम याने जेवण केले. यानंतर आई घरी आलेल्या बहिणीसोबत दवाखान्यात निघून गेल्या. असलम व दोन्ही मुली घरी होते. जेवणानंतर बाहेर पडलेला असलम १२ वाजेच्या सुमारास घरी परतला. यानंतर जमिनीवर कोसळला. असलम हा पडला असल्याची माहिती मावस भाऊ मो.आरीफ शरीफ पटेल यांना कळविण्यात आली. आरीफ यांनी असलम यास जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान असलम याच्या डाव्या डोळ्याजवळ, छातीवर मारहाणीचे व्रण आहे. तर त्याला गळा दाबल्याचेही दिसून येत असल्याचा दावा असलम यांचा मावसभाऊ आरिफ पटेल याने केला.

पोलिसांकडून घटनास्थळाची चौकशीदरम्यान, रामेश्‍वर कॉलनी परिसरात झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा खून झाल्याची अफवा पसरल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे गोविंदा पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली. मात्र मारहाण झाल्याचा काहीच प्रकार घडला नसल्याने स्पष्ट झाले. असलम पटेल याचा घरात पडूनच मृत्यू झाला असल्याचेही पोलिसांनी सांगितले. नेमका त्याचा मृत्यू कसा झाला, याचे नेमके कारण शवविच्छेदनात समोर येणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव