कासली येथील महिलेचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 23:50 IST2019-02-17T23:49:59+5:302019-02-17T23:50:29+5:30

गुडघा व चेहऱ्यावरही जखमा

Suspicious death of a woman in Kasli | कासली येथील महिलेचा संशयास्पद मृत्यू

कासली येथील महिलेचा संशयास्पद मृत्यू

जामनेर : कासली, ता.जामनेर येथील आशाबी साहेबू तडवी (४५) या महिलेचा शेताजवळील नाल्यात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या गळ््यावर दोर आवळल्याचे निशान तर गुडघा व चेहºयावर किरकोळ जखमा आढळून आल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. रविवारी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, आशाबी तडवी या मुलगा व सुनेसोबत शनिवारी बकºया घेऊन शेतात गेल्या होत्या. शनिवारी तळेगाव येथील आठवडे बाजार असल्याने त्यांनी मुलगा व सुनेस बाजारासाठी पाठविले.
बक-या घरी आल्या, महिला आलीच नाही
संध्याकाळी बकºया घराकडे पोहचल्या मात्र आई घरी न परतल्याने मुलगा फारुक (मनोज) तिला शोधण्यासाठी शेतात गेला. त्या वेळी आशाबी या शेताजवळील नाल्यात आढळून आल्या. त्यांना तातडीने तळेगाव येथील खाजगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
महिलेचा मृतदेह रात्री जामनेरला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, सहाय्यक निरीक्षक दिलीप शिरसाठ यांनी कासली येथे भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Suspicious death of a woman in Kasli

टॅग्स :Jalgaonजळगाव